घरताज्या घडामोडीST Workers Strike: परळ-अलिबाग बसच्या चालकाला कार्लेखिंडीत मारहाण

ST Workers Strike: परळ-अलिबाग बसच्या चालकाला कार्लेखिंडीत मारहाण

Subscribe

एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शविल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला असून, ऐन सणासुदीच्या काळात या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यातच परळ-अलिबाग बसच्या चालकाला कार्लेेखिंडीत मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शविल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे. अशातच परळ येथून प्रवाशांना आणणार्‍या बसचालक काशीनाथ गायकवाड आणि वाहक रेणुका थोरात यांचा अलिबाग आगारातील कर्मचार्‍यांनी निषेध केला. कर्मचार्‍यांचा विरोध न जुमानता चालक आणि वाहकाने बस आणल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण होते.

- Advertisement -

एसटी कर्मचारी संघटनेने संप पुकारलेला असतानाही सहभागी न होता परळ-अलिबाग एसटी बस घेऊन आलेल्या एसटी चालकाच्या हातात अलिबाग आगारातील संपात सहभागी असलेली कर्मचार्‍यांनी हातात बांगड्या भरत हार घालून निषेध केला. पेणमध्ये देखील सदर चालकाला कर्मचारी संघटनेने एसटी बस पुढे न नेता तेथेच उभी करण्यास सांगितले होते. मात्र कोणाचेच न ऐकता त्याने अलिबाग येथे बस नेल्याने सर्व कर्मचारी संतप्त झाले होते.दरम्यान, चालक गायकवाड यांना अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंडीत अज्ञातांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. प्रवासी उतरत असताना अचानक दोघांनी बसमध्ये येऊन मारहाण केली. या प्रकरणी अलिबाग पोलीस तपास करीत आहेत.


हे ही वाचा – ST Workers Strike: एसटी संपावर तोडग्यासाठी त्रिसदस्यीस समिती, सरकारी अध्यादेश जारी

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -