घरताज्या घडामोडीमुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

Subscribe

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. आमचा तपास योग्य दिशेने सुरू होता. कुपर रुग्णालयाने दिलेला अहवालही योग्यच होता. सुप्रीम कोर्टानेही तपासाबाबत समाधान व्यक्त केले होते, असेही परमबीर सिंह म्हणाले. सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली. त्या सोशल अकाऊंटची चौकशी सुरू असल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच काही माध्यम संस्थांनी केलेल्या बदनामीविरोधात निवृत्त आयपीएस कोर्टात गेल्याचे सिंह यांनी सांगितले.

एम्सच्या डॉक्टरांनी, पॅनलनेही सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयकडे सोपवला आहे. कुपर हॉस्पिटल, फॉरेन्सिक एक्स्पर्ट आणि आमच्या तपासात ही आत्महत्या असल्याचेच म्हटले होते. एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनलनेही तसाच अहवाल दिल्याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. सत्य कायम समोर येते, असेही परमबीर सिंह यांनी सांगितले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- Advertisement -

सोशल मीडियावर अनेक बनावट अकाऊंट तयार करण्यात आले होते. त्यातून फक्त शिवीगाळ केली जात होती. चुकीची माहिती पसरवली जात होती. सायबर एक्स्पर्ट याचा तपास करत आहेत. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती परमबीर सिंह यांनी सांगितले. दरम्यान, काही मीडिया हाऊसनेही मुंबई पोलिसांविरोधात मोहीम राबवून प्रतिमा मलिन केली होती. त्यांच्या विरोधात निवृत्त आयपीएस अधिकार्‍यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यावर ८ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आम्हाला विश्वास आहे की हायकोर्टही यावर योग्य निर्णय देईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -