घरताज्या घडामोडीT20WC: हार्दिक कोणत्याही भूमिकेत मॅच पालटू शकतो, डेल स्टेनचे मत

T20WC: हार्दिक कोणत्याही भूमिकेत मॅच पालटू शकतो, डेल स्टेनचे मत

Subscribe

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दुखापतीनंतर संघात वापसी केली पंरतु तो सध्या गोलंदाजी करत नाही आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पांड्याने गोलंदाजी केली नाही यामुळे विराट कोहलीने गोलंदाजी केली. पांड्या गोलंदाजी करत नसल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात येईल का? अशी चर्चा सुर झाली आहे. परंतु हार्दिक पांड्या कोणत्याही भूमिकेत मॅच पालटू शकतो यामुळे भारतीय संघ त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळू शकत नाही असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू डेल स्टेन याने व्यक्त केलं आहे.

टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ २४ ऑक्टोबर रोजी पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापुर्वीच हार्दिक पांड्याच्या गोलंदाजी न करण्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. यामुळे पांड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात येईल का? अशी शंका निर्माण झाली आहे. आयपीएल २०२१ च्या हंगामात हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नाही. दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू डेल स्टेननं स्टार स्पोर्ट्सला सांगितले, हार्दिक पांड्या गेम चेंजर आहे. कोणत्याही भूमिकेत पांड्या सामना पालटू शकतो. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही सामना पलटण्याची क्षमता हार्दिक पांड्याकडे आहे. दुखापतीमुळे पांड्याने जास्त गोलंदाजी केली नाही परंतु त्याच्या फलंदाजीसाठी हार्दिक पांड्याला संघात ठेवू इच्छितो असे मत डेल स्टेनने व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

हार्दिक पांड्याचा सध्याच्या फॉर्मकडे पाहता टच अँड गो परिस्थिती आहे. पण तो एक उत्तम खेळाडू आहे. तो जेव्हा फलंदाजीसाठी उतरेल तेव्हा संघांना त्याच्यानुसार तयारी करावी लागेल. कारण हार्दिक पांड्या कोणत्याही परिस्थितीमध्ये विरोधी संघाच्या हातचा सामना हिरावून घेऊ शकतो.


हेही वाचा : T20 WC: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीची गोलंदाजी, हार्दिक पांड्यामुळे गोलंदाजीत वाढली चिंता

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -