घरताज्या घडामोडीसरकार स्थापनेसाठी तालिबानचे पाकिस्तान, चीन, इराण, तुर्कीसह सहा देशांना आमंत्रण, भारताला मात्र...

सरकार स्थापनेसाठी तालिबानचे पाकिस्तान, चीन, इराण, तुर्कीसह सहा देशांना आमंत्रण, भारताला मात्र वगळले

Subscribe

सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी तालिबानने पाकिस्तान, चीन, रशिया, ईराण, कतार, आणि तुर्कीसह अन्य सहा देशांना आमंत्रित केले आहे.

तालिबानने अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा केला असून लवकरच सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. या सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी तालिबानने पाकिस्तान, चीन, रशिया, ईराण, कतार, आणि तुर्कीसह अन्य सहा देशांना आमंत्रित केले आहे. तर दुसरीकडे भारताशी सांस्कृतिक व आर्थिक व्यवसाय संबंध कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या तालिबानने सरकार स्थापनेचे आमंत्रण मात्र भारताला  दिले नाही.

तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहीदने सोमवारी काबुलमध्ये पत्रकार परिषदेत यु्द्धसमाप्तीची घोषणा केली. तसेच आता अफगाणिस्तानात स्थिर सरकार येण्याची आशा त्याने व्यक्त केली. त्याचबरोबर जो कोणी तालिबानविरोधात शस्त्र उचलेल तो देशाचा शत्रू असेल. असे जाहीर केले. त्याचबरोबर बाहेरची लोक आपला देशाला पुन्हा उभा करू शकत नाहीत. त्यामुळे आता देशाच्या पुर्नबांधणीची जबाबदारी आपल्याच माणसांनी घ्यायला हवी असे सांगत मुजाहीद याने कतार, तुर्की आणि अतर आखाती देशांच्या मदतीने लवकरच काबुल विमानतळ सुरू होईल असे जाहीर केले. पण यावेळी इतर देशांना आमंत्रण देताना भारताचे नाव मात्र त्याने घेतले नाही. येत्या काळात चीन व पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानमध्ये नवीन विकासकामे, प्रकल्प सुरू करणार असल्याचेही यावेळी मुजाहीदने सांगितले. रशियाबरोबरही तालिबानने जवळीक निर्माण केली असून अफगाणिस्तानमधील अनेक प्रकल्प करण्यास रशियानेही उत्सुकता दाखवली आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -