घरताज्या घडामोडीTaliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळीयेत

Taliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळीयेत

Subscribe

पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली

अतिवृष्टीमुळे रत्नागरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. यापैकीच एक घटना म्हणजे महाड दुर्घटना. ही दुर्घटना महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज २७ जुलै रोजी महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी दरडग्रस्त तळीये गावाच्या स्थळी पुष्पचक्र अर्पण करुन मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. महाडमधील दुर्घटनाबाबत आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे, या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे.

याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते नीट करणे कठीण असले तरी, सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचे केंद्र सरकार, राज्य सरकारमार्फत पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एकत्रित प्रयत्न केंद्र व राज्य शासन करील.या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रध्दांजली अर्पण करीत असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, तुम्ही सर्वांनी सकारात्मकरित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात लवकर उपाय करण्यासाठी सहकार्य मिळेल.

- Advertisement -

यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार आशिष शेलार,जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबे, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर,तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, तळीये गावाचे सरपंच, दुर्घटनेतील मृत पावलेल्या ग्रामस्थांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.


हेही वाचा – राज्यपालांचे विधान हे त्यांच्यावरील रा. स्व. संघाच्या नेहरुद्वेषाचे संस्कार दर्शवणारे – नाना पटोले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -