घरताज्या घडामोडीशाळा सुरु होण्याआधीच ४१ शिक्षकांना कोरोनाची लागण

शाळा सुरु होण्याआधीच ४१ शिक्षकांना कोरोनाची लागण

Subscribe

शाळा सुरु करण्यापूर्वीच ४१ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

देशावरील कोरोनाचे संकट अजून गेलेलं नाही. कोरोना संकटाची टांगती तलवार अजूनही देशावर आहे. कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक कोटीचा आकडा पार केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि वद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन सर्व शाळांना मार्च महिन्यात सुट्टी देण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांची शिकवणी सुरु ठेवली आहे. एक वर्षानंतर अखेर कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने शाळा पुन्हा सुरु करण्याकडे वाटचाल करत आहेत. अनेक राज्यांतील शाळा सुरु केल्या गेल्या आहेत. परंतु हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात ४१ शिक्षकांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने मोठी खळबळ माजली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये फेब्रुवारीपासून शाळा सुरु करण्यात येत आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली यामध्ये ४१ शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा अहवाला सकारात्मक आला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील १९ तर बिलासपूर आणि सिमला जिल्ह्यातील १ शिक्षक आहे. शाळा सुरु करण्यापूर्वीच ४१ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशमध्ये राज्य सरकारच्या आदेशानुसार १ फेब्रुवारीपासून पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहे. तर डिग्री कॉलेजचे वर्ग ८ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. तसेच खासगी शाळांनाही परवानगी देण्यात आली आहे. परंतु राज्यातील सगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी कोरोना चाचणीचे अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांचेही अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा ५७४२४ वर पोहोचला आहे तर ३१४ कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. यामधील ५६१३१ रुग्णांनी कोरोना मात केली आहे. आतापर्यत ९६३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -