घरताज्या घडामोडीवाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यास मंत्रिमंडळाची संमती

वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यास मंत्रिमंडळाची संमती

Subscribe

कुंभारवाडा, चांभारपुरा, सुतारगल्ली, ब्राह्मणआळी, पारशीवाडा अशी ही वस्त्यांची नावे राज्यातील विविध शहरे, गावांमध्ये हमखास आढळून येतात. वस्त्यांची ही जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच आगामी हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यावरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

पुरोगामी महाराष्ट्रात जातीवरून ठेवण्यात आलेल्या गावे, तालुके आणि वस्तूंना ठेवण्यात आलेल्या नावांमुळे अनेकदा जातीय सलोखा बिघडतो. परिणामी जातीपातीवरून राज्यात अनेकदा दंगली उसळल्या होत्या. अशा घटनांना कारण ठरणारी नावे तात्काळ बदलण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

अशा वस्ती-वाड्यांना आता नवीन नावे देण्यात येतील. वाड्या-वस्त्यांना शाहूनगर, समतानगर, ज्योतीनगर, प्रगतीनगर, विकासनगर अशी नावे ठेवण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने मंत्रिमंडळाला पाठवला होता.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी तसे संकेतही दिले होते. काळानुसार काही निर्णय घेण्याची गरज असते. यापुढे महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते.

- Advertisement -

जातीवाचक नावांमुळे ग्रामीण भागात भेदाभेद आणि विषमता पसरते. मात्र, समाजातील सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्याचा संदेश देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

एसटीला १००० कोटी देण्यास मान्यता
कोरोनाच्या महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची वाहतूक व्यवस्था होती. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी महामंडळास राज्य शासनाकडून एक हजार रुपयांच्या कोटींचे विशेष अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. हा निधी परिवहन विभागाला वर्ग करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

तलाठी भरतीचा मार्ग मोकळा लवकरच होणार नियुक्त्या

मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्गही शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.

थोरात म्हणाले की, बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यांतील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.

२६ जिल्ह्यांतील तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. पण सात जिल्ह्यातील भरतीला स्थगिती देण्यात आली होती. अहमदनगरमध्ये या भरती प्रक्रियेत १० उमेदवार डमी असल्याचा संशय व्यक्त झाला होता. या संशयितांना वगळून ही प्रक्रिया देखील सुरु होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -