घरठाणेParambir Singh : परमबीर सिंहांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट कोर्टाकडून रद्द

Parambir Singh : परमबीर सिंहांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट कोर्टाकडून रद्द

Subscribe

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबईसह ठाण्यात खंडणी वसुली प्रकरणात पाच ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांनी न्यायलयात हजेरी लावत चौकशीला सहकार्य करणार असल्याचे कबुल केल्याना त्यांना कोर्टाकडून दिला मिळाला आहे. त्यांनी दिलेल्या हमीमुळेच परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. एकुण १५ हजाराच्या जातमुचलक्यावर हे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

वॉरंट रद्द करताना परमबीर सिंह यांना काही अटी शर्थींवरच हे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. एकुण १५ हजारच्या जात मुचलक्यावर तसेच तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचा हमीवर हे वॉरंट न्यायालयाने रद्द केले आहे. परमबीर सिंग न्यायालयातून पुन्हा ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्या संदर्भातील काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह हे आज शुक्रवारी ठाण्यात दाखल झाले. त्यांच्यावर क्रिकेट बुकी केतन तन्ना आणि सोनू जालान यांनी खंडणीचे आरोप करत तक्रार केली होती. त्यामुळेच ठाणे नगर पोलिस ठाण्यात ते आज सकाळीच हजर झाले. याठिकाणी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी परमबीर सिंह यांची चौकशी केली. दरम्यानच्या काळात ते ठाण्यातील कोर्टातही हजर राहिले. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. २०१८ साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून ३ कोटी ४५ लाख रुपये वसूल केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात परमबीर सिंह यांना ठाणे नगर पोलिसांनी समन्स जारी केले होते. ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती.


Parambir singh : चांदीवाल आयोगाच्या इशारा, अन् परमबीर सिंहांची शरणागती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -