घरठाणेसंभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज दोन ते अडीच हजार अतिरिक्त...

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज दोन ते अडीच हजार अतिरिक्त बेडसचे नियोजन

Subscribe

दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्ण संख्या आणि अपुरा पडलेला ऑक्सिजन साठा लक्षात घेत, त्या दृष्टीने शहरी भागासह ग्रामीण भागात वाढीव बेडस यांच्याबरोबर ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा दिवसाला उपलब्ध करणारी यंत्रणा उभा केली आहे

पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेतून धाड घेत, ठाणे जिल्हा प्रशासनाने शासनाच्या सुचनेनुसार जोरदार तयारी करत तिसऱ्यावर स्वार होण्याच्या दृष्टीने चांगलीच कंबर खचली आहे. दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्ण संख्या आणि अपुरा पडलेला ऑक्सिजन साठा लक्षात घेत, त्या दृष्टीने शहरी भागासह ग्रामीण भागात वाढीव बेडस यांच्याबरोबर ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा दिवसाला उपलब्ध करणारी यंत्रणा उभा केली आहे. ही तयारी दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तीनपटीने करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केरळमध्ये तिसऱ्या लाटेने धडक दिलेली आहे. त्यातच तिसऱ्या लाटेची संभावना व्यक्त केली जात आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाटेचा तीव्रता अधिक असल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढली होती. त्यातच ठाणे जिल्ह्यात एप्रिल, मे महिन्यात जवळपास दिवसाला ६५०० रुग्णांची नोंदणी होत होती. कालांतराने तो आकडा कमी होत आता कुठे दिवसाला जिल्ह्यात २५० च्या जवळपास आला आहे. यामुळे जिल्ह्याचा सध्याचा पॉझीटीव्हीटी दर हा १.७६ टक्के एवढा आहे. तर ऑक्सीजनचे सध्या ९ टक्केच बेड फुल असल्याचे सांगितले जात आहे. परंतु कोरोनाची दुसरी लाट जेव्हा वेगाने वाढली होती तेंव्हा ऑक्सिजन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा राज्यात जाणवत होता.शासकीय रुग्णालयांपासून खासगी रुग्णालयात ही परिस्थिती सेम होती.  त्यावेळेस जिल्ह्यात दिवसाला २१९ मेट्रीक टन ऑक्सीजन लागत होते. पण, रुग्ण संख्या कमी झाल्याने आता ऑक्सिजनची गरज ही कमी झाली आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्याचे बोलले जात असताना आता तिसऱ्या लाटेचा संभावना वर्तवली जाऊ लागली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या लक्षात घेऊन त्या संख्येच्या तिपटीने तयारी केली आहे. मग त्यामध्ये विशेष करून ऑक्सिजन निर्मिती भर दिला गेला आहे. यासाठी लिक्विड टॅंक , पी एस इ प्लांट ( हवेतील) आणि जम्बो सिलिंडर अशारितीने ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यात आली आहे. यामध्ये लिक्विड ७० टक्के, पीएमए द्वारे २० आणि जम्बो सिलिंडर १० टक्के असे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने ७०० मेट्रिक टन दररोजच्या ऑक्सिजनचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्हा नियोजन समितीतून आणखी दोन हजार जम्बो सिलिंडर घेण्यात येणार आहे. या प्लांटमधून खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने ठेवली आहे.

- Advertisement -

खासगी रुग्णालयांना प्लांट उभारण्याचा सुचना

जिल्हा पातळीवर ऑक्सिजन प्लांट उभे राहिले आहेत. त्याच धर्तीवर काळाची गरज लक्षात घेऊन मोठया खासगी रुग्णालयांनाही स्वतः चे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची सुचना केली आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसोबत करार करण्याबाबत सुचवले आहे. जेणे करून गरज लागल्यास त्या कंपन्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होईल आणि ते ऑक्सिजन साठा देण्यास बंधनकारक राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

६५८ मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोजचे ६ हजाराहून अधिक अॅक्टीव्ह रुग्ण धरुन ही संख्या ८६ हजार ७३२ एवढी अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या सरासरी पकडल्यास १२ टक्के रुग्णांना ऑक्सीजन लागत होता. तर २५ टक्के रुग्ण हे आयसीयु आणि व्हॅन्टीलेटरचे धरण्यात आले आहेत. त्यानुसार १९९ मेट्रीक टन ऑक्सीजन आणि इतर रुग्णांना देखील १० टक्के ऑक्सीजन लागत होते. त्यानुसार २१९ मेट्रीक टन ऑक्सीजन हा दिवसाला लागत होता. त्या अनुषंगाने थेट तिप्पट ऑक्सीजनचा पुरवठा करावा लागणार असल्याने त्यानुसार ६५७ मेट्रीक टन क्षमतेची तयारी आरोग्य विभागाने केली आहे.

- Advertisement -

अतिरिक्त अडीच हजार बेडसची व्यवस्था

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात १४ हजारांहून अधिक बेडसची व्यवस्था दुसऱ्या लाटेपासून आहे. त्यामध्ये आणखी अडीच हजार बेडस वाढविण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे आणि नवीमुंबई येथे उभारलेल्या दोन कोव्हिड सेंटर मध्ये प्रत्येकी एक हजार आणि सिव्हिल रुग्णालय आणि अन्य ठिकाणी ५०० च्या आसपास बेडसचे अतिरिक्त नियोजन केले आहे.

” संभावना असलेल्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने शासनाच्या सुचनेनुसार ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे. हे नियोजन करताना ते दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तीनपटीने नियोजनाची तयारी केली आहे. ऑक्सिजन साठ्याबरोबर बेडसही वाढवण्यावर भर दिला आहे. ऑक्सिजनची क्षमता ७०० मेट्रिक टन झाली असून बेडसची संख्या १६ हजारांहून अधिक आहे.”- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे


हेही वाचा –भाजप-मनसे युतीच्या हालचाली वाढल्या; उद्या चंद्रकांतदादा घेणार राज ठाकरेंची भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -