घरठाणेThane Fire : ठाण्यात दोन दिवसात किरकोळ २७ आगीच्या घटना; फटाक्यांमुळे लागल्या...

Thane Fire : ठाण्यात दोन दिवसात किरकोळ २७ आगीच्या घटना; फटाक्यांमुळे लागल्या सात आगी

Subscribe

सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

ठाणे शहरातील विविध भागात दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये तब्बल २७ आगीच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या फक्त सात आगीच्या घटनांचा समावेश आहे.फटाक्यांमुळे प्रामुख्याने कचराच पेटला आहे. या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून, यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात डझनभर घटनांमध्ये आगी लागल्या असून, त्या सर्व आगी संध्याकाळनंतर लागल्या आहेत. सात घटना या फटाक्यांमुळे लागल्या आहेत. यामध्ये पांचपाखाडी, नामदेव वाडीतील मरी गोल्ड बिल्डिंगच्या ११ व्या मजल्यावर फटाक्यांमुळे खिडकीच्या नायलॉन जाळ्याला किरकोळ आग. तर कळवा येथील गणपती विसर्जन घाटाजवळील फटाक्यांमुळे कचऱ्याला आग लागली आहे. घोडबंदर रोड,मानपाड्यात फटाक्यांमुळे एसीच्या बाहेरील युनिटला आग लागली.वर्तक नगर, पोखरण रोड क्र.१ येथे फटाक्यांमुळे नारळाच्या झाडाला आग लागली. वागळे इस्टेट, रोड नंबर १६ येथील कृषी कार्यालयाजवळील मालवण किनारा पोळीभाजी केंद्राच्या प्लास्टिकच्या ताडपत्रीमध्ये फटाक्यांमुळे किरकोळ आग लागली.

- Advertisement -

याचबरोबर दिवा डम्पिंगसह वसंत विहार येथील जस्मिन टॉवर,च्या १५ व्या मजल्यावरील खोली आणि सह्याद्री हाऊसमधील वॉशिंग मशीनमध्ये तसेच बाळकुम येथे ट्रकच्या ड्रायव्हर केबिनमध्ये किरकोळ आग लागली. तर दुसऱ्या दिवशीही १५ ठिकाणी आग लागली असून त्याही किरकोळ आगी असून एका घटनेत कारने पेट घेतला आहे. ही घटना राबोडी साकेत मैदान येथे घडली. याच दरम्यान वागळे इस्टेट,जय भवानी मंदिराजवळ फटाक्यांमुळे कचऱ्याला किरकोळ आग लागली होती. एकंदरीत या सर्व घटना किरकोळ स्वरूपातील असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली. या घटनांची माहिती मिळताच तातडीने ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभाग,अग्निशमन दल, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्याच्या नियंत्रण मिळविण्यावर विशेष भर देण्यात आल्याचे आपत्ती विभागाने सांगितले.


हे ही वाचा :- ‘ही तर फक्त सुरुवात आहे’, समीर वानखेडेंना तपासातून हटवल्यानंतर नवाब मालिकांची प्रतिक्रिया

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -