Thane Fire : मुंब्र्यात दोन प्लास्टिक भंगारच्या गोदामांना लागलेल्या आगीवर नियंत्रण

ठाण्यातील शीळफाटा, मुंब्रा येथील दोस्ती कॉम्प्लेक्सजवळील खान कंपाऊंडमधील २ प्लास्टिक भंगार मटेरियलच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. ही दुर्घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास लागली. या आगीवर जवळपास सहा तासांनी नियंत्रण मिळविण्यात यश आले.

Thane Fire: Control of fire at two plastic scrap warehouses in Mumbra
Thane Fire : मुंब्र्यात दोन प्लास्टिक भंगारच्या गोदामांना लागलेल्या आगीवर नियंत्रण

ठाण्यातील शीळफाटा, मुंब्रा येथील दोस्ती कॉम्प्लेक्सजवळील खान कंपाऊंडमधील २ प्लास्टिक भंगार मटेरियलच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. ही दुर्घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास लागली. या आगीवर जवळपास सहा तासांनी नियंत्रण मिळविण्यात यश आले. या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र गोदामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मुंब्रा- शीळफाटा येथे भंगारातील प्लास्टिक वस्तू असलेल्या गोदामांना आग लागल्याची माहिती मिळताच, ठाणे महापालिका अग्निशमन, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस या विभागांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले.

मात्र, प्लास्टिक वस्तू असल्याने आगीने काही क्षणात रुद्र रुषधारण केले. मध्यरात्री २.२० वाजता लागलेली आग नियंत्रनात येण्यासाठी शुक्रवारी सकाळचे जवळपास ८ वाजले. यावेळी, अग्निशमन दलाच्या दोन फायर इंजिन, दोन क्युआरव्हीच्या गाड्या, एक जंबो टँकर, दोन पाण्याचे टँकर आणि एक जेसीबी असे पाचारण केले होते. सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही दुखापत किंवा कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.


हेही वाचा – Corona : चिंता वाढली! भारतात कोरोनाचा हाहाकार, दुसऱ्या लाटेच्या पुनरावृत्तीची शक्यता