Thane Fire : ठाण्यात एमएसईडीसीच्या मीटर रूमला आग ; 81 मीटर बॉक्स जळून खाक

ठाण्यातील माजीवडा परिसरातून भीषण आगीची घटना समोर आली आहे. लोढा लक्सुरिया, वेस्ट गेट 'सी' या तळ अधिक 27 मजली बिल्डिंगच्या तळमजल्यावरील एमएसईडीसीच्या मीटर रूमला ही आग लागली आहे. बुधवारी 12 जानेवारीला सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Thane Fire: Fire at MSEDC's meter room in Thane; Burn the 81 meter box
Thane Fire : ठाण्यात एमएसईडीसीच्या मीटर रूमला आग ; 81 मीटर बॉक्स जळून खाक

ठाण्यातील माजीवडा परिसरातून भीषण आगीची घटना समोर आली आहे. लोढा लक्सुरिया, वेस्ट गेट ‘सी’ या तळ अधिक 27 मजली बिल्डिंगच्या तळमजल्यावरील एमएसईडीसीच्या मीटर रूमला ही आग लागली आहे. बुधवारी 12 जानेवारीला सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. या भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर झाला. या धूराचे लोट चौथ्या मजल्यापर्यंत पोहचले होते. तर आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. या एमआयडीसीच्या मीटर रुमला लागलेल्या आगीत रुममधील 81 मीटर मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत.

मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याशिवाय कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच, एमएसईडीसी अधिकारी, ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, १-फायर इंजिन आणि १-जंबो वॉटर टँकर पाचारण केले होते. अशी माहिती आपत्ती विभागाने दिली.

 


हेही वाचा – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक, Elon Musk असा नावात केला बदल