घरठाणेहरवलेली महत्वाची कागदपत्रे तब्बल साडेपाच वर्षांनी मिळाली

हरवलेली महत्वाची कागदपत्रे तब्बल साडेपाच वर्षांनी मिळाली

Subscribe

‘कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती’ याचा प्रत्यय नुकताच ठाण्यात आला आहे. तब्बल साडेपाच वर्षांपूर्वी हरवलेल्या प्लाटिक पिशवीतील जन्म दाखल्यापासून शैक्षणिक अशी सर्वच महत्वाची कागदपत्रे ठाणे रेल्वे प्रशासनाने संबंधित केरळ येथील प्रवासी महिलेचा शोध घेत त्यांना परत केली आहेत. मात्र त्या जन्मजात मुंबईतील रहिवासी असून लग्नानंतर त्या केरळवासी झाल्या आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकाचे तत्कालिन उपप्रबंधक लक्ष्मण दास हे २०१५ मध्ये कार्यान्वित असताना, एक अनोळखी रेल्वे प्रवासी ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात आला. त्यांनी साहेब, रेल्वे प्रवासात ही प्लाटिकची पिशवी मिळाली आहे. त्यामध्ये काही महत्वाची कागदपत्रे दिसत आहेत असे सांगितले. त्यानुसार त्या प्लाटिक पिशवीतील ती कागदपत्रे रेजिमोल कुंजप्पन नामक महिलेची असल्याचे समोर आले. यावेळी पिशवीत काही दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी नंबर दास यांना मिळून आले. मात्र त्यापैकी एक ही नंबर कुंजप्पन यांचा नव्हता. कागदपत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन सात ते आठ महिने दास यांचा कुंजप्पन यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू होत्या. दरम्यान, कुंजप्पन यांचा नंबर मिळाल्यावर त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांना कागदपत्रांबाबत माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आपण केरळ येथे असून जेव्हा मुंबई परत येऊ तेव्हा संपर्क करून कागदपत्रे घेऊन जाऊ असे सांगितले. परंतू साडेपाच वर्षात त्यांचे मुंबईत येणे झालेच नाही. त्यातच नोव्हेंबर २०२० मध्ये त्या काही कारणास्तव मुंबईत आल्या होत्या. तेव्हा त्यांनी दास यांच्याशी संपर्क करून आपली हरवलेली महत्वाची कागदपत्रे परत मिळवली. त्यावेळी, त्यांनी रेल्वे प्रशासनाचे ही आभार मानले. तसेच हरवलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

- Advertisement -

‘जन्म दाखला, सिनिअर केजी पासून बी.कॉम या कागदपत्रांसह एटीएम कार्ड, चेकबुक, छायाचित्र आदी महत्वाची कागदपत्रे होती. ही कागदपत्रे एखाद्याच्या आयुष्यात किती महत्वाची आहेत. याची कल्पना असल्याने तातडीने कुंजप्पन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातून आठ महिन्यांनी संपर्क झाल्यावर त्यांना कागदपत्रांबाबत सांगितले. लग्नानंतर त्या केरळमध्ये राहत असल्याने त्यांचे याचदरम्यान मुंबई येणे झाले नाही. मात्र ती कागदपत्रे जीवपेक्षा जास्त जपून ठेवली होती. काल अखेर फोन आल्यावर कुंजप्पन यांना ती कागदपत्रे खातरजमा करून परत केली.’ – लक्ष्मण दास, तत्कालीन उप प्रबंधक, ठाणे रेल्वे स्थानक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -