Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे मुंब्र्यात 9 एप्रिलपर्यंत मनसेच्या अविनाश जाधवांना प्रवेश बंदी

मुंब्र्यात 9 एप्रिलपर्यंत मनसेच्या अविनाश जाधवांना प्रवेश बंदी

Subscribe

ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे दाखल असल्याचे सोमवारी काढण्यात आलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. संभाव्य कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, मुंब्रा हा संवेदनशील परिसर आणि रमजान महिन्याचा दाखला देत सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे यांनी अविनाश जाधव यांच्याविरोधात सीआरपीसीच्या कलम 144 अंतर्गत प्रवेशबंदी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुंब्रा शहरात आणि आसपासच्या परिसरात येण्यास ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे. याबाबत सोमवारी आदेश काढण्यात आले आहेत. (thane police bans entry of mns leader avinash jadhav in mumbra till april 9)

या आदेशानुसार, अविनाश जाधव यांना 27 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत मुंब्र्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाय, सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक मालमत्ता आणि जीवितास कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आल्याचे समजते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे दाखल असल्याचे सोमवारी काढण्यात आलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. संभाव्य कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, मुंब्रा हा संवेदनशील परिसर आणि रमजान महिन्याचा दाखला देत सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे यांनी अविनाश जाधव यांच्याविरोधात सीआरपीसीच्या कलम 144 अंतर्गत प्रवेशबंदी केली आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात (22 मार्च) महिमच्या समुद्रातील अवैध बांधकांमाची चित्रफित दाखवत विविध ठिकाणी एका विशिष्ट धर्माच्या अवैध बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनीदेखील ठाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुंब्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अवैध मजार आणि मशिदी हटवण्याचे आवाहन केले होते. तसेच, कारवाई केली नाही तर या ठिकाणी हनुमानाचे मंदिर बांधू असेही जाधव यांनी सांगितले होते.

- Advertisement -

ठाणे पोलिसांच्या या आदेशानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अविनाश जाधव यांनी सांगितले की, “आम्ही कायदेशीर केलेल्या मागणीला धार्मिक रंग चढवला जातोय. मी 9 तारखेनंतर नक्की मुंब्र्यात जाईन आणि हनुमानाचे मंदिर उभारुन दाखवेन”, असे जाधव म्हणाले. मुंब्रा देवी डोंगरातील अनधिकृत मझार आणि मशिदविरोधात अविनाश जाधव यांनी वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यामुळे धार्मिक वातावरण बिघडत असल्याचे कारण पोलिसांनी दिलं आहे.


हेही वाचा – अग्निवीरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा : पहिली तुकडी नौदलात होणार दाखल, INS चिल्कावर पासिंग

- Advertisment -