घरताज्या घडामोडीपूरग्रस्तांनी मानले मुस्लिम बांधवांचे आभार

पूरग्रस्तांनी मानले मुस्लिम बांधवांचे आभार

Subscribe

महाड तालुक्यातील ग्रामस्थांनी हाळ गावाचे कौतुक करीत मनापासून आभार मानले.

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने बुधवारपासून अधिक जोर पकडला होता. गुरुवारी महाड शहर आणि परिसरात पूर आल्यामुळे जवळपास संपूर्ण तालुक्यात पाणीच पाणी झाले. या पूरग्रस्तांसाठी राज्यातील अनेकांनी आपापल्या परिने मदतीचा हात दिला. खालापूर तालुक्यातील हाळ गावातील मुस्लिम बांधवानी देखील माणुसकीचा संदेश देत सर्व आवश्यक वस्तूंची मदत महाड तालुक्यातील आदिवासी बांधवांसह सर्वच पुरग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे महाड तालुक्यातील ग्रामस्थांनी हाळ गावाचे कौतुक करीत मनापासून आभार मानले. हाळ बुद्रुक, हाळ खुर्द एक, हाळ खुर्द दोन, सांगडा, आजिवली या पाच गावातील मुस्लिम बांधवांनी घरोघरी जावून विविध घरगुती साहित्य, पाणी, औषधी, बिस्कीट, कपडे गोळा केले आणि जिवनावश्यक वस्तुंनी भरलेले जवळ-जवळ १० ते १२ टेम्पो साहित्य महाड तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी रवाना केले होते.
पूराचा मोठा फटका लोकांना बसला आणि त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. जगावे तर कसे? असा प्रश्न निर्माण झाला, यावेळी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला, पण मुस्लिम समाजाने घरोघरी जावून मिळतील त्या वस्तू गोळा केल्या. महात्मा आसपास राहणाऱ्या मुस्लिम समाजाने कोरोनामुळे ‘बकरी ईद’ साधेपणाने साजरी करीत ‘ते’ पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले. सर्वात प्रथम मदतीचा हात मुस्लिम समुदायाने दिल्याने सर्वच समाजाच्या महाडकरांनी या आपत्ती काळात मदत केल्याने मुस्लिम समाजाने मनापासून आभार मानले.

जाती-धर्माच्या भिंती पडल्या उन्मळून

राजकीय पक्ष नेते, धार्मिक संघटना आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वत:च्या फायद्यासाठी धार्मिकद्वेष निर्माण करीत असतात. पण निसर्ग हा कोणताच भेदभाव पाळत नाही, त्यामुळे तो आपला कहर धर्म, जात, पक्ष, संघटना, व्यक्ती, त्याची प्रतिष्ठा, त्याचा पैसा पाहून न येता सर्वांसाठी येतो आणि सर्व काही नेस्तनाबूद करून जातो. महाड शहरात देखील क्षणात होत्याचे नव्हते झाले. खाण्यापिण्यापासून लाईट व स्वच्छतेच्या वस्तू मिळविण्यासाठी रोडपतीपासून करोडपतीलाही रस्त्यावर उतरून विणवणी करावी लागली. जाती-धर्माच्या भिंती उन्मळून पडल्या आणि पूरग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या लोकांचे पूरग्रस्तांनी आभार मानले. यात खोपोली हाळ गावातील मुस्लिम बांधवांचे देखील महाडच्या ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
                                                                                                        -खलील सुर्वे (खोपोली)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -