पेणमधील गणेश मूर्ती कारखानदार पीओपी वरील बंदी उठवण्यासाठी दिल्लीत् धडकणार

गणेशोत्सवापासून प्लास्टर ऑफ पॅरिस हद्दपार करण्याचा निर्णय पर्यावरण खात्याने घेतला आहे.

The Ganesh idol manufacturer in Pen went to Delhi to lift the ban on POP
पेणमधील गणेश मूर्ती कारखानदार पीओपी वरील बंदी उठवण्यासाठी दिल्लीत् धडकणार

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची पुढील वर्षी गणेशोत्सवपासून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पुढील गणेशोत्सवापासून प्लास्टर ऑफ पॅरिस हद्दपार करण्याचा निर्णय पर्यावरण खात्याने घेतला आहे. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्ती हद्दपार होणार आहे यासाठी गणेश मूर्ती कारखानदार पीओपी वरील बंदी उठवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहेत. यासाठी उरणचे आमदार महेश बालदी व जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच त्यांची भेट घेऊन गणेश मूर्ती कारखानदारांच्या व्यथा मांडणार आहेत.

…तर मूर्तीकारांचे आर्थिक नुकसान होईल

त्यांना मूर्ती कारखानदारांना न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले गणेश मूर्ती कारखानदार यांनी आ. महेश बालदी व युवा नेते वैकुंठ पाटील यांनी गणेश मूर्ती कारखानदारांची पनवेल येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री आले असता निवेदनाद्वारे व्यथा मांडण्यात आल्या होत्या मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो त्यावर केंद्राने बंदी आणल्यामुळे रायगड जिल्ह्यातील सात ते दहा हजार व महाराष्ट्रातील १८ ते २० लाख लोक या उद्योगावर अवलंबून आहेत. जर का प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवर बंदी आणली तर रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात गणेश मूर्ती बनवणार्‍या कलाकारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईल. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ शकते प्रत्यक्षात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमुर्ती मुळे पर्यावरणावर कोणताही परिणाम होत नसल्याचा निष्कर्ष समितीने नेमलेल्या शास्त्रज्ञांनी काढला आहे त्यामुळे गणेश मुर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर बंदी आणू नये असे गणेश मूर्ती कारखानदारांचे म्हणणे आहे.

गणेश मूर्तींना देण्यात येणार्‍या रंगा मुळे प्रदूषण होते असे पर्यावरण खात्याचे म्हणणे आहे तसे असेल तर पर्यावरण खाते सांगेल ते रंग वापरण्यास मूर्ती कारखानदार तयार आहेत पीओपी ला पर्याय म्हणून पर्यावरण खात्याने शाडू मातीची मूर्ती बनवण्यास सांगत आहेत परंतु मातीच्या मूर्ती बनवण्यामध्ये परिश्रम जास्त असते कारण की मातीची मूर्ती बनविताना १० ते १५ टक्के गणेश मूर्ती मध्ये तूट होत असते जर का मूर्तीला तडा गेल्यास भाविकांच्या भावना दुखावल्या जातात यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे पेण तालुक्यात घरोघरी गणपतीच्या मुर्त्या बनवल्या जातात शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करण्यास अधिक कालावधी लागतो आणि जागा देखील अधिक लागते गणेश मूर्ती कारखानदाराने याबाबत उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे जाऊन त्यांच्या व्यथा मांडल्या.

त्यांच्यासोबत युवा नेते वैकुंठ पाटील यांनी गणेश मूर्ती कारण सोबत जाऊन आमदारांची भेट घेतली यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रविकांत म्हात्रे, सचिव प्रवीण बावधनकर, खजिनदार कैलास पाटील, हमरापुर विभाग गणेश मूर्तिकार अध्यक्ष गोपीनाथ मोकल, सचिव राजन पाटील, खजिनदार रोशन नाईक, सदस्य व आदी कारखानदार उपस्थित होते यावेळी आमदार महेश बादली यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची तातडीने वेळ घेऊन भेट घेणार असल्याचे मूर्ती कारखानदारांना आश्वासन दिले व तातडीने दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या गणेश मूर्ती कारखानदारांचे प्रश्न व्यथा मांडणार असून त्यांना योग्य ते न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

 

  वार्ताहर – मितेश जाधव 


हे ही वाचा – अदानींच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जचं काय झालं? – सचिन पायलट