घरताज्या घडामोडीशाळेची घंटा वाजली ; शालेय साहित्य विक्रेत्यांना आले सुगीचे दिवस

शाळेची घंटा वाजली ; शालेय साहित्य विक्रेत्यांना आले सुगीचे दिवस

Subscribe

शैक्षणिक साहित्याची विक्री पूर्णवेळ ठप्प होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांतील इयत्ता पाचवीपासून पुढील वर्ग सोमवारपासून सुरू झाले आहे. यामुळे शाळांवर अवलंबून असलेले दप्तर, गणवेश, शैक्षणिक साहित्य विक्री करणारे व्यावसायिक आणि दुकानदारांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. येथील स्टेशनरी विक्रेते प्रल्हाद खाडे यांनी सांगितले की, तब्बल दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने वही, पेन, पेन्सिल, पुस्तके, दप्तर, कंपास आदी शैक्षणिक साहित्याची विक्री पूर्णवेळ ठप्प होती. मात्र शाळा सुरू होणार असे जाहीर झाल्यानंतर काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची या वस्तू खरेदीची लगबग सुरू आहे. त्यामुळे नवीन माल देखील मागवला आहे. तर टेलर सलीम शेख याने सांगितले की, अनेकजण गणवेश शिवण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे इतके दिवस संथगतीने सुरू असलेल्या व्यवसायाला गती मिळाली आहे.

चप्पल विक्रेत्याने सांगितले की, मुले शाळा सुरू होणार म्हणून नवीन शूज, सँडल आणि चप्पल खरेदी करीत आहेत. पालक अजय जाधव म्हणाले की, मागील वर्षी नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरूच झाल्या नसल्याने गणवेश, दप्तर, शूज, कंपास असे कोणतेच शैक्षणिक साहित्य घेतले नव्हते. मात्र आता मुलांची शाळा सुरू होत आहे. त्यामुळे हे आवश्यक साहित्य खरेदी केले आहे.

- Advertisement -

शाळा सुरू होणार असल्याने नवीन शैक्षणिक साहित्य, गणवेश, बूट आदी आवश्यक साहित्य खरेदीसाठी बाजारात नागरिकांची लगबग सुरू आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि दुकांदारांचा धंदा चांगला होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी सुद्धा घेतली जात आहे. अनेकांनी अधिकचा माल मागवला आहे.
-प्रशांत खैरे, उपाध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, पाली

शाळा सुरू होणार म्हणून खूप आंनद होत आहे. तसेच मित्र-मैत्रिणी भेटणार, शिवाय नवीन दप्तर, शूज, साहित्य आणि गणवेश मिळणार आहे. त्यामुळे आणखीनच आनंद होत आहे.
-सुजल वाघपंजे, विद्यार्थी

- Advertisement -

हे ही वाचा – Nobel : स्पर्शाच्या रिसेप्टर्सचे संशोधन, दोन अमेरिकन वैज्ञानिकांना नोबेल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -