घरताज्या घडामोडीजगातील सर्वाधिक लांबीचा टनेल आता भारतात

जगातील सर्वाधिक लांबीचा टनेल आता भारतात

Subscribe

पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हिमालयातील अटल बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं स्वप्न पूर्ण झालेले नाही, तर हिमालच प्रदेशातील करोडो लोकांचाही गेल्या कित्येक दशकांची प्रतीक्षा संपली आहे, असे कौतुकोद्गार काढले. महत्त्वाचे म्हणजे याआधीचा चीनचा सर्वात जास्त लांबीचा टनेल असणारा विक्रम अटल टनेलच्या माध्यमातून मोडला गेला आहे. या टनेलच्या निमित्तानेही भारताने चीनला शह दिला आहे, असे बोलले जात आहे.

लाहौल स्पीती ते मनाली दरम्यानचा हा सर्वाधिक लांबीचा असा टनेल आहे. या टनेलची संकल्पना सर्वात आधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००० साली मांडली होती. त्यानंतर जवळपास २० वर्षांनंतर हा टनेल प्रत्यक्षात आला आहे. टनेलचे काम पूर्ण करण्यास १० वर्षांचा काळ लागला. हिमालयातील पीर पंजाल डोंगररांगेत रोहतांग खिंडीलगत लेह-मनाली महामार्गावर बांधले गेले आहे. यामुळे मनाली ते लेह हे अंतर 46 किलोमीटरने कमी होईल आणि चार तासांची बचत होईल.

- Advertisement -

काय आहे वैशिष्ट्य?

पीएमओच्या (पंतप्रधान कार्यालयाच्या) माहितीनुसार अटल बोगदा हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. ९.०२ किमी लांबीच्या बोगद्यामुळे मनालीला लाहौल स्पीती खोर्‍याला वर्षभर जोडलं जाईल. याआधी सहा महिन्यांपासून हिमवृष्टीमुळे हा रस्ता बंद होता. हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगामध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार मीटर उंचीवर बोगदा तयार करण्यात आला आहे. जगातील सर्वात लांब बोगदा आहे. अटल बोगद्याचे दक्षिणेकडील पोर्टल ३,०६० मीटर उंचीवर मनालीपासून २५ कि.मी. अंतरावर आहे, तर उत्तर पोर्टल लाहौल खोर्‍यातील तेलिंग, तासू, सिसू गावाजवळ ३,०७१ मीटर उंचीवर आहे.

- Advertisement -

हा बोगदा देशाच्या संरक्षण दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. अटल बोगद्याची रचना जास्तीत जास्त ८० किमी प्रतितास वेगाने दररोज किमान तीन हजार कार आणि १५०० ट्रक जातील अशी केली आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये
टनेल 10.5 मीटर रुंद, 10 मीटर उंच
खर्च ३३०० कोटी रुपये
स्टीलचा वापर 14508 मीट्रिक
सिमेंट 2,37,596 मीस्ट्रीक
डोंगर पोखरला 14 लाख घन मीटर
प्रत्येक 150 मीटर अंतरावर 4 जी ची सुविधा

अटल बोगद्यात राहतील या सुविधा

प्रत्येक 150 मीटरच्या अंतरावर एक टेलिफोन
प्रत्येक 60 मीटरच्या अंतरावर फायर सिस्टम
प्रत्येक 250 मीटरच्या अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे
प्रत्येक 500 मीटरवर इमरजेंसी एग्जिट
प्रत्येक 2.2 किमीवर गुहा मोड
80 किमी/तास राहणार वाहनांचा स्पीड
प्रत्येक दिवशी 4500 वाहन या बोगद्यातून प्रवास करतील असा अंदाज

आधीचा विक्रम चीनच्या नावावर होता
अटल बोगद्यापूर्वी हा विक्रम चीनच्या तिबेटमधील बोगद्याच्या नावावर होता. ल्हासा आणि न्यिंग्ची दरम्यान 400 किमी लांबीच्या महामार्गावर हे बांधले गेले आहे. त्याची लांबी 5.7 किमी आहे. हे मिला माऊंटेनवर बांधले गेले आहे. त्याची उंची 4750 मीटर म्हणजेच 15583 फूट आहे. ते तयार करण्यासाठी 38500 कोटी रुपये खर्च झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -