घरठाणेचिंताजनक : मातोश्री वृध्दाश्रमात कोरोना रुग्ण संख्या वाढतेय ; एकूण ८० कोरोना...

चिंताजनक : मातोश्री वृध्दाश्रमात कोरोना रुग्ण संख्या वाढतेय ; एकूण ८० कोरोना बाधित

Subscribe

प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा अंतर्गत मौजे सोरगाव, मातोश्री वृध्दाश्रमात  २७ नोव्हेंबरला ६२ ज्येष्ठ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून निकट सहवासितांच्या तपासणीमध्ये (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) आजपर्यंत १८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या रुग्णांची एकूण संख्या ८० झाली आहे. त्यापैकी ७९ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील ७५ रुग्ण सामान्य कक्षात तर ४ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी दिली.

मातोश्री वृध्दाश्रमात  २७ नोव्हेंबरला एक आरटीपीसीआर आणि १०९ जणांची ॲण्टीजेन चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत एक जण तर ॲण्टीजेन चाचणीत ६१ जण असे एकूण ६२ जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर जिल्हा आरोग्य, ग्रामपंचायत यंत्रणेकडून या भागात आणि परिसरात निकटसहवासितांची तसेच नातेवाईक, कर्मचारी यांची चाचणी करण्यात आली. त्याअंतर्गत दि.२९ नोव्हेंबरला ५२ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली त्यामध्ये १७ जण पॉझिटिव्ह आढळले होते. नुकतेच दि. १ डिसेंबरला १८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात त्यात एक जण पॉझीटिव्ह आढळून आल्याचे डॉ. रेंघे यांनी सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा – Imran Khan : पाकिस्तान दूतावासाचे ट्विटर हँडल हॅक; कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल चिंताग्रस्त मेसेज व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -