घरताज्या घडामोडीरायगडमधील डेल्टा प्लस रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची प्रकृती उत्तम

रायगडमधील डेल्टा प्लस रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची प्रकृती उत्तम

Subscribe

अफवांवर विश्वास न ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार दोन रुग्णांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्याचवेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी काही जणांचा अहवाल त्यावेळी पॉझिटिव्ह आला होता, मात्र ते पूर्णतः बरे झाले असून, त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासन सक्षम असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरु नये, कोव्हिड-१९ संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केले आहे.

डेल्टा प्लसवर राजेश टोपे म्हणतात…

राज्यात डेल्टा प्लसच्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र या ५ रुग्णांचा मृत्यू डेल्टा प्लसमुळेच झाला असेल असं म्हणता येणार नाही असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही काही रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. सध्या राज्यात ८० टक्के डेल्टाचे आहेत. मात्र काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी २० ऑगस्टपासून विमानसेवा होणार सुरु


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -