घरताज्या घडामोडीwater scarcity : पोलादपुरात पाण्यावाचून जनतेचे हाल

water scarcity : पोलादपुरात पाण्यावाचून जनतेचे हाल

Subscribe

पाणी पुरवठा करणारी सावित्री नदी पात्रातील विहीर वाहून गेली...

गेल्या ४ दिवसांपासून शहर आणि अन्य वसाहतींमध्ये पाण्यावाचून नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शहराला नळ पाणी पुरवठा करणारी सावित्री नदी पात्रातील विहीर वाहून गेली आणि विहिरीच्या पात्राच्या पृष्ठभागापासून १५ फूट खोल असलेला भाग दगड, माती आणि धोंड्यांनी भरून गेला होता. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यावाचून हाल सहन करावे लागेल होते. त्यावेळी नगर पंचायत प्रशासनाकडून पात्रातील डोहात पाइप टाकून पंपाद्वारे नगर पंचायत कार्यालयासमोरील साठवण टाकीत पाणी नेण्यात आले. तेथून पुन्हा नळाद्वारे शहर आणि अन्य वसाहतींमधील नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात आले होते मात्र चार दिवसांपूर्वी अचानक धरणातून येणारा पाण्याचा प्रवाह कमी किंवा बंद झाला आणि पंप मशीन बंद पडली.

यासंदर्भात येथील ज्येष्ठ नागरिक दिलीप साबळे यांनी सांगितले की, कोणतीही पूर्वसूचना न देता धरण व्यवस्थापनाने पाणी बंद केल्याने बाजारपेठ, सिद्धेश्वर आळी, शिवाजीनगर, भैरवनाथ नगराचा काठालगतचा भाग, सह्याद्री नगर येथील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. धरण बांधताना त्यातील पाणी मोठ्या पाइपामधून नेण्यात येणार होते. त्यावेळी नागरिकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रखर विरोध केल्याने झालेल्या तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सभेमधील चर्चेत पाइपव्दारा पाणी नेण्याऐवजी पात्रातून पाणी पुढे महाडकडे जाईल, ज्यामुळे शहरासह लोहारे, पारले, दिविल अशा नदी काठालगतच्या गावांना त्याचा लाभ होईल,अशी मागणी मान्य करावी लागली होती.

- Advertisement -

मात्र आता अधिकार्‍यांना त्याचा विसर पडला आहे किंवा नवीन आलेल्या अधिकार्‍यांना माहित नाही. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकट काळात धरण व्यवस्थापनाने अविवेकी आणि माणुसकीहिन असे कृत्य करून पाणी बंद केले आहे. त्यामुळे महाड एमआयडीसी वसाहतीने धरणाच्या आतील बाजूस पाणी उचलण्यास पोलादपूरकरांना मंजुरी देण्याची मागणी असून, लवकरच या संदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

महाड एमआयडीसीच्या नियमांनुसार धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. पोलादपूर नगर पंचायतीच्या वाहून गेलेल्या विहिरीमुळे शहराला पाणी पुरवठा करता येत नाही.
-एस. एम. कवडगे, मुख्य अधिकारी
रानबाजीरे धरण

- Advertisement -

नदीच्या पात्रात सध्या पाइप आणि पंपाद्वारे पाणी पुरवठ्याची हंगामी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असून, दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरू करू. तूर्त टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
-महादेव रोडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलादपूर नगर पंचायत

 

                                                                                   वार्ताहर – बबन शेलार


हे ही वाचा – १०० कोटी घोटाळा गृहमंत्री गायब, २५ हजार कोटी घोटाळ्यात कोणाचा नंबर?, चित्रा वाघ यांचा सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -