घरताज्या घडामोडीकोरोनाची लस आली!

कोरोनाची लस आली!

Subscribe

फायझर बायोएनटेकच्या लसीला ब्रिटनची परवानगी, एक आठवड्यात सर्वांना उपलब्ध होणार

कोरोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लसीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. कोरोनावरील लसीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती.

जगाला वेठीस धरणार्‍या कोरोना संकटावर मात करण्यासाठी सगळीकडेच युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना महामारीविरोधातील लढाईत ब्रिटनला एक आशेचा किरण दिसला आहे. फायझर आणि बायोएनटेकच्या लसीचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटन सरकारने फायझर व बायोएनटेकच्या लसीला आज परवानगी दिली. फायझरची लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप किंवा अमेरिकेत सर्वात आधी लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना कोरोनावरील लसीला मान्यता देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. फायझरची लस कोरोनावर ९५ टक्के प्रभावी असून, जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लसीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -