घरताज्या घडामोडीकर्जतच्या कोविड उपचार केंद्र परिसरात जंतुनाशक फवारणीच नाही

कर्जतच्या कोविड उपचार केंद्र परिसरात जंतुनाशक फवारणीच नाही

Subscribe

कर्जत नगरपरिषदेची असहकाराची भूमिका?

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे असताना नगर परिषदेच्या आरोग्य स्वच्छता विभागाने येथील उप जिल्हा रुग्णालयाच्या कोविड उपचार केंद्र परिसरात वर्षभरात एकदाही जंतूनाशक फवारणी केली नसल्याचा थेट आरोप रुग्णलयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी केला असून, तशी सरकारी दप्तरी नोंदसुद्धा केली आहे. नगर परिषदेच्या या असहकाराच्या भूमिकेबाबत नागरिकांतूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहराच्या मध्यभागी ५० खाटांचे भव्य उप जिल्हा रुग्णालय आहे. येथे कोविड सेंटर उभारण्यात आलेले आहे. आतापर्यत शेकडो कोरोना रुग्णांवर तेथे उपचार केले गेले आहेत. याच परिसरात काही अंतरावर लसीकरण केंद्रसुद्धा आहे. त्यामुळे नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. या परिसरात नियमित नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता पथकाने स्वच्छता आणि फवारणी करणे क्रमप्राप्त, तसेच बंधनकारक आहे. तरीही याबाबत चालढकल होत असल्याने हे नागरिकांच्या आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्यादृष्टीने हितकारक नसल्याचे स्पष्ट मत डॉ. बनसोडे यांनी व्यक्त केले आहे. विशेष करून रुग्णालयाच्या सल्लागार समितीमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिनिधी म्हणून स्वीकृत नगरसेवक संकेत भासे असताना त्यांनी रुग्णालयाच्या फवारणीकडे दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

स्वच्छता राखणे, फवारणी करणे हे नगर परिषदेचे काम आहे. मात्र ते करीत नाहीत. याबाबत कळवूनही परिस्थिती जैसे थे आहे. रुग्णालयाचा परिसर मोठा असल्याने छोट्या ट्रॅक्टरद्वारे फवारणी अपेक्षित आहे. मात्र नगर परिषदेचा एखादा कर्मचारी खांद्यावर पंप घेऊन कधीतरी बाहेरच्या बाहेर फवारणी करतो. सदर कर्मचारी लागण होण्याची भीती व्यक्त करत कोविड केंद्राच्या सर्व परिसरात फवारणी करीत नाहीत.
– डॉ. मनोज बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक, कर्जत उप जिल्हा रुग्णालय

फवारणी बाबत आरोग्य व स्वच्छता विभागाला सूचना देऊ.
– पंकज पाटील, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद

- Advertisement -

वर्ष भरात एकदाही फवारणी केली नाही ही बाब गंभीर आहे. याबाबत नगर परिषदेकडे विचारणा करण्यात येईल.
– शरद लाड, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस, कर्जत नगर परिषद

 

                                                                                                – ज्योती जाधव


हे ही वाचा – अनिल देशमुखांना धक्का, वकिलाला CBI कडून अटक, अहवालात अधिकाऱ्यामार्फत फेरफार केल्याचा आरोप


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -