घरताज्या घडामोडीपनवेलमधील वडाळे तलाव रस्त्यावर अखेर थर्मोप्लास्ट गतिरोधक

पनवेलमधील वडाळे तलाव रस्त्यावर अखेर थर्मोप्लास्ट गतिरोधक

Subscribe

रस्त्यावर भरधाव वेगाने आणि बेजबाबदारपणे जाणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर पुन्हा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

पनवेल शहरातील वि.के. हायस्कूल मागील नव्याने झालेल्या रस्त्यावर शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक व लहान मुले पाय मोकळे करण्यासाठी तथा विरंगुळ्यासाठी फिरण्यासाठी येतात. हा रस्ता मोकळा असल्याने तरुण मुले त्यावर बेजबाबदारपणे दुचाकी वाहन धूम स्टाईलने चालवत जोर जोरात हॉर्न वाजतात,तसेच इतर अनेक चारचाकी वाहनांची वर्दळ देखील भरधाव वेगाने व बेजबाबदारपणे सुरु असते.सदर रस्त्यावर काही ब्लाइंड वळणे देखील आहेत. काही वर्षांपूर्वी एक चार चाकी गाडी भरधाव वेगाने जात असताना नियंत्रण सुटल्यामुळे बाजूस असलेल्या तलावात पडली होती. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु या रस्त्यावर भरधाव वेगाने आणि बेजबाबदारपणे जाणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर पुन्हा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ही बाब काही सतर्क नागरिकांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.लहान मुले,वृद्ध व्यक्ती तसेच इतरांसोबत रस्त्यावर दुर्घटना होण्याची संभावना लक्षात घेऊन विक्रांत पाटील यांनी त्वरीत महापालिका अधिकाऱ्यांशी बोलून या रस्त्यावर थर्मोप्लास्ट गतिरोधक लावण्यास सांगितले व त्यासंबंधी पत्रसुद्धा दिले.
त्याचप्रमाणे व्ही. के. हायस्कुल मागील रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहने चालविणाऱ्यांवर लगाम बसावा याकरिता त्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवावे, जेणेकरुन तिथे फिरायला-चालायला येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही, अशी मागणी मनसेचे पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील ह्यांच्यातर्फे २४ जून रोजी पनवेल महापालिकेला करण्यात आली होती.
महापालिकेने विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कारवाही करत या रस्त्यावर थर्मोप्लास्ट गतिरोधक बसवून घेतले. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य अपघातांचा धोका टळण्यासाठी मदत झाली आहे. नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी पनवेल नागरिकांनाकडून नगरसेवक विक्रांत पाटील व मनसेचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांना धन्यवाद दिले जात आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -