घरक्राइमNagpur: बिनडोक चोरांचे प्रताप! साडे आठ लाखांचे हिरे खोटे समजून फेकून...

Nagpur: बिनडोक चोरांचे प्रताप! साडे आठ लाखांचे हिरे खोटे समजून फेकून दिले

Subscribe

भरभक्कम तब्बल साठ आठ लाखांचा हिऱ्यांचा दस्ताऐवज नागपूरात तीन चोरांच्या हाती लागलेला लागला होता. मात्र चोरांच्या अज्ञानाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास त्यांनी त्यांच्याच हाताने त्यांनी दूर केला.

वस्तू चोरी करणारे चोर हे फार हुशार आणि चलाख असतात असे आपल्याला वाटते. मात्र नागपूरातील एका चोरांच्या टोळीचे प्रताप ऐकून तुम्हालाही डोक्यात हात मारावासा वाटेल. हिऱ्याची पारख केवळ जौहरालाच असते असे म्हणतात ते काही उगचाच नाही.  भरभक्कम तब्बल साडे आठ लाखांचा हिऱ्यांचा दस्ताऐवज नागपूरात तीन चोरांच्या हाती लागलेला लागला होता. मात्र चोरांच्या अज्ञानाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास त्यांनी त्यांच्याच हाताने त्यांनी दूर केला. तब्बल साडे आठ लाखांचे हिरे खोटे समजून बिनडोक चोरांनी ते फेकून दिले. नागपूर लोहमार्ग पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या तीन अज्ञानी चोरांना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

ही घटना १० ऑगस्टची. नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले तीन चोर मागील वर्षभरापासून देशातील विविध रेल्वे स्थानकांवर धावत्या रेल्वेमधून चोरी करत होते. १० ऑगस्ट रोजी चोरांनी हावडा गितांजली एक्सप्रेसमध्ये दोन महिलांची पर्स चोरी केली. त्या पर्समध्ये १९ लाख १२ हजरांचे सोने आणि हिरेजडीत दागिने होते. चोरांनी चोरी केल्यानंतर त्यातील सोने सोनाराकडे जाऊन वितळवले. सोने वितळवल्यानंतर आलेली रक्कम तिघांनी आपआपसात लाटून घेतली. मात्र त्यात असलेले लाखो रुपयांचे हिरे त्यांना खोटे वाटले आणि त्यांनी ते चक्क फेकून दिले.

- Advertisement -

लोहमार्ग पोलीस उपनिरिक्षक प्रवीण भोवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन चोरांनी गोंदिया हावडा लाईनजवळ रेल्वेतीन दोन महिलाच्या पर्स चोरल्या आणि ते आसाम या त्यांच्या गावी निघून गेले. धावत्या रेल्वेत वारंवार होणाऱ्या चोऱ्यांची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत. चोरीच्या घटनांचे सीसीटिव्ही फूटेज तपासून पोलीस चोरांच्या आसाम या गावी पोहचले आणि तिघांना पोलिसांनी अटक केली. एखाद्या गोष्टीचे अज्ञान माणसाल अधोगतीकडे नेते याचे उत्तम उदाहरण या प्रकरणातून समोर आले आहे.


हेही वाचा – नो हेल्मेट, नो पेट्रोल आदेशाचे उल्लंघन; पंचवटीतील तीन पेट्रोलपंपांना नोटिसा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -