पोलादपूर कुडपान अपघात: जखमींवर विविध रूग्णालयात उपचार सुरू

mahashivratri 2022 deoghar baba temple is crowded by devotees on mahashivratri stampede occurred many injured bruk
Mahashivratri 2022 : देवघर बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी

जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपान धनगरवाडी जवळील वळणावर वऱ्हाडाच्या ट्रकला काल अपघात झाला.  कुडपान गावातील दरीत तब्बल ३०० फूट खोल हा वर्‍हाडाचा ट्रक कोसळला. यामध्ये चौघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.  दरम्यान, रेस्क्यू टीम आणि पोलादपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मदतकार्य सुरू असून अंधार झाल्यामुळे मतदकार्यात अडचणी येत आहेत. आवश्यक ती मदत देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

या गाडीत ३० ते ३५ प्रवासी असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा ट्रक रत्नागिरी येथून पोलादपूरला जात असताना हा अपघात झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकार्‍यांना पाठवण्यात आले. तसेच रक्ताची गरज भासेल यासाठी ब्लड बँकेलाही सूचना देण्यात आली असल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली आहे.

यात एकूण १५ जखमींना महाडच्या रानवडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १० जणांना उपचारांदरम्यान घरी पाठविण्यात आले आहे. तर महाडच्या भोस्तेकर हॉस्पिटलमध्ये ४ जखमींना दाखल करण्यात आले आले. त्याच्यापैकी दोन जखमींना आज दुपारी घरी सोडण्यात येणार आहे. या घटनेतील ७ जखमींना पोलादपूरच्या ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. तिथल्या रूग्णांची स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सिताराम जाधव या ५५ वर्षीय व्यक्तीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे सिटिस्कॅनचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत. विवध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी व्यक्तींची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने आणि त्यांच्या पथकाने सगळ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. सर्व जखमींना देत असलेल्या वैद्यकिय सुविधांवर ते लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे पालकमंत्री अदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना वेळोवेळी संपूर्ण माहिती देत आहेत.


हेही वाचा – कशेडी घाटात बसचा मोठा अपघात; चिमुरड्याचा मृत्यू, १५ जण जखमी