घरताज्या घडामोडी...तर इंदुरीकरांच्या तोंडाला काळे फासणार - तृप्ती देसाई

…तर इंदुरीकरांच्या तोंडाला काळे फासणार – तृप्ती देसाई

Subscribe

महिला व संततीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात दोन-तीन दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकरांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मंगळवारी नगरमध्ये दिला.

महिला व संततीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात दोन-तीन दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकरांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मंगळवारी नगरमध्ये दिला. तर त्यांना वाचविणाऱ्या मंत्री आणि राजकारण्यांनादेखील अद्दल घडविण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे टिकेचे धनी बनलेल्या इंदुरीकरांच्या अडचणीत यामुळे आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

तृप्ती देसाईंना वारकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला

तृप्ती देसाई नगरमध्ये येण्यापूर्वी त्यांना सुप्याजवळ काही वारकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला. अनिसपाठोपाठ तृप्ती देसाई यांनीदेखील इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, यासाठी त्या मंगळवारी त्या नगरमध्ये आल्या होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेत त्यांनी इंदुरीकरांविरोधात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इंदुरीकर यांना नोटीस बजावली असून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील असं पोलिस अधीक्षकांनी सांगीतल्याचे त्या म्हणाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसात इंदुरीकरांवर गुन्हा दाखल झाला नाही तर इंदुरीकरांच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा त्यांनी दिला.

- Advertisement -

 वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मंत्रालयात कोंडून अद्दल घडवू 

काही राजकारणी इंदुरीकर यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांनी हे उद्योग बंद करावेत अन्यथा त्यांनादेखील मंत्रालयात कोंडून अद्दल घडवू, असेदेखील त्या म्हणाल्या. इंदुरीकर महिलांबद्दल जे काही बोलत आहेत, त्याचे पुरावेदेखील पोलिसांना दिले आहेत. आम्हाला नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा त्याना देण्यात आला होता, त्याबद्दल बोलतांना अडविणारे पेड कार्यकर्ते असावेत, त्यांचा काहीतरी लाभ होत असावा, त्यामुळेच ते विरोध करत असावेत, असे त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -