Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम काळाचौकीमध्ये ज्वेलर्सवर दरोडा; २ कोटी ८२ लाखांचे दागिने पळवले

काळाचौकीमध्ये ज्वेलर्सवर दरोडा; २ कोटी ८२ लाखांचे दागिने पळवले

मुंबईच्या काळाचौकीमध्ये घातलेल्या दरोड्यात तब्बल पावणे तीन कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या काळाचौकीमध्ये मंगल ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा घातल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून या दरोड्यामध्ये तब्बल २ कोटी ८३ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरुन नेला आहे. या चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेज ज्या टीव्हीमध्ये सेव्ह होतात. ती डिव्हीआर मशीन देखील पळवून नेली आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. पोलीस याप्रकरणी चोरांचा शोध घेत आहेत.

अशी केली चोरी

मुंबईच्या काळाचौकी येथे असलेल्या एका मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानात १५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दरोडा पडल्याचे समोर आले आहे. सर्वप्रथम चोरट्यांनी दुकानाचे दोन्ही बाजूचे सेंटर लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि दुकानात दरोडा घातला. यामध्ये त्यांनी साडे पाच किलो सोन्याचे दागिने तसेच ९ किलो चांदी असा ऐवज चोरी केला आहे. एकूण २ कोटी ८३ लाखांचा ऐवज घेऊन चोरांनी पळ काढला. त्यांनी सीसीटीव्हीचे फुटेज सेव्ह होणारा टीव्ही म्हणजे डीव्हीआर देखील पळवून नेला. त्यामुळे चोरांनी पूर्ण प्लॅनिंग करुन हा दरोडा घातला आहे. त्यांच्याकडून कोणताही पुरावा राहिलेला नाही. त्यामुळे आता या चोरांचा शोध घेणे फार कठीण झाले असून त्यांचा शोध घेणे पोलिसांन समोर मोठे चॅलेंज असणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास घेत असून चोरांचा शोध घेत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – पत्नीच्या ‘या’ व्यसनामुळे मागितला पतीने घटस्फोट


 

- Advertisement -