Thane : ठाण्यातील उपवन परिसरात दोघांचा बुडून मृत्यू

ठाण्यात दोन जणांना बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना ठाण्यातील उपवन परिसरात घडली असून,22 जानेवारीला शनिवारी दुपारच्या सुमारास झाली. या मृतांपैकी एकाचे नाव गौतम वाल्मिकी असून हा 12 वर्षाचा आहे तर, निशू वाल्मिकी हा 15 वर्षाचा आहे. या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन,टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाला यश आले आहे.

Two drowned in Thane's Upavan area

ठाण्यातील उपवन फायरिंग स्टेशनजवळील डबक्यातील पाण्यात दोघे जण बुडल्याची माहिती मिळताच टीडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन, वर्तक नगर पोलीस आणि अग्निशमन दल या विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले. काही तासात त्या बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोध काढण्यात यश आले असून ते पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत

हेही वाचा – Mumbai Fire : मुंबईतील ताडदेव इमारत आग दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी