नव्या आयुक्तांचा पहिलाच दणका, कल्याणमध्ये तीन अधिकारी निलंबित

कल्याण आणि डोंबिवली स्टेशनच्या स्कायवॉकवरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

on skywalk peddlers
Two officers suspended because of taking no action against the peddlers

कल्याण आणि डोंबिवली स्टेशनच्या स्कायवॉकवरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात हलगर्जीपणा करणारे डोंबिवलीतील ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे, कल्याणातील ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश माने या तिघांना निलंबित केले आहे. पालिका आयुक्तांच्या कारवाईने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्री महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण आणि डोंबिवलीतील स्कायवॉकचा पाहणी दौरा केला होता. रात्री 11 वाजता केलेल्या या दौऱ्यात त्यांना अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या. रात्री 11 वाजून गेल्यानंतरही या दोन्ही स्कायवॉकवरून चालायलाही जागा नसल्याचे आयुक्तांना आढळून आले. स्कायवॉकवरील फेरीवाल्यांबाबत याआधीही नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे, संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या मात्र या सर्व तक्रारींना केराची टोपली आणि स्कायवॉकवरील अनधिकृत फेरीवाल्यांना रेड कार्पेट अशीच प्रशासनाची भूमिका दिसून येत होती.

तीन अधिकाऱ्यांचे निलंबन 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याला छेद देत नागरिकांच्या बाजूची भूमिका घेतल्याचे आजच्या कारवाईने स्पष्ट केले आहे. दरम्यान फेरीवाल्यांवरील या कारवाईमध्ये डोंबिवलीतील ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे, कल्याणातील ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश माने या तिघांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे कल्याण डोंबिवलीतील बेशिस्त आणि कामचुकार अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनीही स्वागत केले आहे.