घरठाणेशिवसेनेच्या शाखेतच विभाग प्रमुखावर धारदार शस्त्राने हल्ला, गंभीर जखमी

शिवसेनेच्या शाखेतच विभाग प्रमुखावर धारदार शस्त्राने हल्ला, गंभीर जखमी

Subscribe

विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी तात्काळ बेडया ठोकल्या

ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर २ जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. शिवसेनेच्या शाखेत शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या दोघांनी जयस्वाल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अमित जयस्वाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील ज्यूपीटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यादरम्यान आरोपींनाही दुखापत झाली असल्यामुळे त्यांच्यावरही उपचार सुरु असून त्यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन पाहणी केली. तसेच विभागप्रमुख जयस्वाल यांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे.

शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्याला, पायाला आणि कानाला गंभीर दुखापत झाली आहे. दोन दिवसांपुर्वी अमित जयस्वाल यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाचे निमित्त साधून शुभेच्छा देण्यासाठी २ तरुण शिवसेना शाखेत आले आणि त्यांनी अमित जयस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. शिवसेनेच्या वृंदावन सोसायटी येथील शाखेत आले त्यांनी धारदार शस्त्रानी वार केले आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागप्रमुख जयस्वाल यांची स्थानिक रुग्णलयात जाऊन भेट घेतली आहे.

- Advertisement -

विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी तात्काळ बेडया ठोकल्या असून ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृंदावन सोसायटी येथील हे आरोपी आहे. हा हल्ला २ ते ३ वर्षांपुर्वीच्या पुर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे या हल्ल्याचे पसाद गुरुवारी उमटण्याची शक्यता आहे. हल्लेखोरांना देखील मार लागला असल्यामुळे त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलीस अधिक चौकशी करत असून हा हल्ला का करण्यात आला याबाबत अधिक माहिती समोर येईल.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -