राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पेणमधील दोन खेळाडूंची निवड

टीम मॅनेजरपदी पांडुरंग म्हात्रे

Two players from Penn were selected for the national swimming
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पेणमधील दोन खेळाडूंची निवड

४७ व्या ज्युनिअर आणि ७४ व्या सिनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात रायगड जिल्हा जलतरण संघटनेच्या येथील दोन खेळाडूंची निवड झाली आहे. ज्युनिअर गटात ५० मीटर फ्रीस्टाइल आणि ५० मीटर ब्रेस्ट या दोन इव्हेंटसाठी अथर्व लोधी याची निवड झाली असून, ही स्पर्धा येत्या १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत बंगळुरू येथे होणार आहे.तसेच सिनिअर राष्ट्रीय पुरुष जलतरण स्पर्धेतील वॉटरपोलो संघात महंत म्हात्रे याची निवड झाली आहे. ही स्पर्धा २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत तेथेच होत आहे. तसेच महाराष्ट्राच्या सिनिअर संघाचे टीम मॅनेजर म्हणून रायगड जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे खजिनदार पांडुरंग म्हात्रे यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंसह टीम मॅनेजर म्हात्रे यांचे जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष परेश ठाकूर आणि उपाध्यक्ष नितीन पाटील, तालुका हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश नेने, रशाद मुजावर, खातू, अनिल पाटील यांनी अभिनंदन केले आहे.


हे ही वाचा – १४ ऑक्टोबरनंतर खाद्य तेलाचे दर गडगडणार, मोदी सरकारचे मोठा निर्णय