घरताज्या घडामोडीUnion Budget 2021: सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी; सोने-चांदी होणार स्वस्त!

Union Budget 2021: सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी; सोने-चांदी होणार स्वस्त!

Subscribe

सोने, चांदी आणि तांब्यावरील कस्टम ड्युटी २.५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने सोने-चांदीच्या दरात घसरण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विविध मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोने-चांदी स्वस्त होणार आहे. सोने-चांदीवरील कस्टम ड्युटीत कपात करण्यात आलेल्या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्मला सीतारामन यांनी सोने, चांदी आणि तांब्यावरील कस्टम ड्युटी २.५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने सोने-चांदीच्या दरात घसरण होणार आहे.

दरम्यान, सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी होणार असल्याने सोन्या-चांदीचे दर कमी होणार आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा असणार आहे. तर भारतीय बनावटीचे मोबाईल उपकरणांवरील वाढवण्यात आली असून आता ती अडीच टक्के करण्यात आली आहे. यासह तांबे आणि स्टीलवरील कस्टम ड्यूटी कमी करण्यात आली आहे. तर १ ऑक्टोबरपासून देशात नवीन कस्टम पॉलिसी लागू केली जाणार आहे.

- Advertisement -

तसेच चप्पल आणि स्वदेशी कपडेही स्वस्त होणार असून मोबाईल, चार्जर, विदेशी कपडे, तांबे आणि इलेक्ट्रिक उपकरणे स्वस्त होणार आहेत. याशिवाय भारतीय बनावटीचे मोबाईल स्वस्त होणार आहेत. तर परदेशी बनावटीचे मोबाईल, चार्जर महागणार आहेत. पेट्रोलचे दर वाढणार असल्याने नागरिकांनध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल, डिझेलवर लागणार कृषी अधिभार

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागणार आहे. त्यामुळे लवकरच पेट्रोल डिझेल शंभरी गाठणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोलवर २.५० कृषी अधिभार तर डिझेलवर ४ रुपयांचा कृषी अधिभार लागणार आहे. जरी हा निर्णय घेण्यात आला असला तरी थेट कृषी अधिभाराचा परिणाम पेट्रोल डिझेल किमतींवर होणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.


Union Budget 2021: आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा; कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -