घरताज्या घडामोडीUnion Budget 2021: अर्थसंकल्प ५ राज्यांसाठीच, राजस्थान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बजेटवर टीका

Union Budget 2021: अर्थसंकल्प ५ राज्यांसाठीच, राजस्थान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बजेटवर टीका

Subscribe

देशाचा अर्थसंकल्प निराशादायी - सचिन पायलट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प २०२१ सादर केला. या अर्थसंकल्पात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि कोरोना काळात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काही योजना आणि तरतूदी केल्या आहेत. या बजेटला भाजपच्या नेत्यांनी विकास आणि विश्वासदर्शक बजेट म्हटले आहे तर विरोधी पक्षातील नेत्यांनी या बजेटवर बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बजेवटविरोधत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. राजस्थानमधील नेत्यांनीही वेग-वेगळ्या प्रतिक्रिया या बजेटविरोधात दिल्या आहेत. कोणी या बजेटचे स्वागत केले तर कोणी बजेटला साफ विरोध केला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांसह बड्या नेत्यांनी या बजेटला विरोध केला आहे.

राजस्थानला अर्थसंकल्पात काहीच नाही – मुख्यमंत्री गहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केंद्र सरकारच्या या बजेटवर टीका केली आहे. हा बजेट देशाचा नसून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे. केंद्रीय बजेटपेक्षा पाच निवडणूक राज्यांसाठी हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलाय असे दिसत असल्याचे गहलोत यांनी म्हटले आहे. बजेटमध्ये ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काही योजना नाहीत. राजस्थानला अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा होत्या परंतु प्रदेशातील जनतेने बजेटवर नाराजी दर्शवली आहे. या बजेटमध्ये पेट्रोल-डिजेलवर सेस कर लावण्यात आला परंतु इंधनाच्या किंमती कमी केल्या नाही.

- Advertisement -

वसुंधरांनी केले बजेटचे कौतुक

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विट करत बजेटचे स्वागत केले आहे. देशाच्या लोकतंत्र आणि पवित्र्य मुल्यांना अनुसरुण असा बजेट आहे. हा आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणारा बजेट आहे. देशाच्या विकासासाठी, महिला आणि शेतकरी, व्यापारी आणि सर्व वर्गातील तरुणांना काळजी घेणारा बजेट असल्याचे वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे.

देशाचा अर्थसंकल्प निराशादायी – सचिन पायलट

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी अर्थसंकल्प २०२१ वर नाराजी दर्शवली आहे. पायलट यांनी म्हटले आहे की, या बजेटवरुन असे दिसते की, देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे आणि सरकारकडे ठोस उपाययोजना नाही आहेत. तसेच हा अर्थसंकल्प महागाई वाढवणारा आहे. शेतकरी, बेरोजगारी आणि छोट्या उद्योग समुहांना सुधारणा करण्यासाठी काही योजना नाहीत. मध्यम वर्गीयांना उपेक्षित ठेवल्याचेही पायलट यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

अर्थसंकल्प सादर करताना बेनिवाल यांनी केले वॉकआउट

नागौर संसद आणि आरएलपी प्रमुख हनुमान बेनीवाल यांनी बजेट भाषण सुरु असताना विरोध दर्शवला होता. तसेच कृषी कायद्यांना मागे घेण्याची मागणी करत बेनीवाल यांनी संसद भवनातून बाहेर निघाले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -