घरताज्या घडामोडीमाथेरानमधील अपरिचित वेताळेश्वर मंदिर तुम्हाला ठाऊक आहे का?

माथेरानमधील अपरिचित वेताळेश्वर मंदिर तुम्हाला ठाऊक आहे का?

Subscribe

नगरपालिकेने जर सुधारित रस्ता केला तर भविष्यात हे मंदिर आणि परिसर पर्यटक पर्यटनस्थळ म्हणून ज्ञात होईल.

मुंबई आणि पेण येथून सर्वात जवळचे आणि भारतातील सर्वात लहान गिरीस्थान अशी माथेरानची ओळख आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेलं पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेलं माथेरान हे वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांमुळे पर्यटकांना भुरळ पाडते आहे. मात्र या पर्यटनस्थळावर असे काही प्रेक्षणीय स्थळ आहेत ते पर्यटकांना देखील माहीत नाहीत.त्यातील एक स्थळ म्हणजे वेताळेश्वर मंदिर. हा ब्रिटिश काळापासून माथेरानकरांना परिचित असलेला दुर्गम भाग असून घनदाट जंगलात हे मंदिर आहे. शंकराचे देवस्थान असल्याने माथेरान मधील भाविक याला आवर्जून दर्शनासाठी जात असतात.माथेरान वाहनतळ असलेलं दस्तुरी अथवा अमनलॉज स्थानकापासून फक्त वीस मिनिटे दूर असलेलं वेताळेश्वर हे प्राचीन भाग आहे. शंकराचे स्थान असल्याने पूर्वी येथे स्मशान होते.कालांतराने ही स्मशानभूमी बंद करून या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. राजपूत समाजातील भाविक आजही श्रद्धेने येथे पूजा अर्चा करण्यासाठी जातात कारण याअगोदर वेताळेश्वराला लागूनच या समाजाचा धोबी घाट होता.

‘हे’ शिल्पदेखील आढळून येते…

कालांतराने येथे माथेरानचे सर्व भविक जाऊ लागले. क्षत्रिय मराठा समाजाचे दिवंगत रामचंद्र शिंदे,बाबाजी शेलार,व दगडू मालुसरे यांनी एक भव्य मंदिर उभारण्यासाठी सार्वजनिक वर्गणी जमा करून सुंदर मंदिराची उभारणी केली.दरम्यान हा भाग स्वच्छ करण्यासाठी श्रमदान देखील केले.दुर्गम भाग असल्याने जायला रस्ता देखील नव्हता तो श्रमदानाने केला गेला.श्रमदान करत असताना त्याकाळच्या दगडांवर संस्कृत भाषेत लिखावट केलेल्या काही शिल्प देखील आढळून आले.आजही हे शिल्प वेताळेश्वराच्या प्रवेशद्वारात ठेवले आहेत.

- Advertisement -

 निसर्गाच्या सानिध्यातील वेताळेश्वर मंदिर

महाशिवरात्र असो किंवा श्रावण महिना भाविक या मंदिराला अवश्य भेट देतात.निसर्गाचा अनमोल ठेवा पहावा तर या ठिकाणी.घनदाट जंगल,त्यामध्ये वसलेलं मंदिर,मंदिराच्या समोर खळखळणारा झऱ्याच वाहतं पाणी,निरव शांतता व त्या शांततेत पक्षांचा किलबिलाट काही वेळा तर जंगली प्राण्यांचे दर्शन सुद्धा होते.या मंदिरापुढे सुंदर,विलोभनीय स्थळ आहे.  प्रेक्षणीय स्थळाकडे जाताना काळ्या खडकावरून चालत जावे लागते.

हा पर्यटकांना माहीत नसलेला भाग स्थानिकांचा वन भोजनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटक फार कमी प्रमाणात याठिकाणी जातात.तर काही पर्यटक या भागापासून अनभिज्ञ आहेत.नगरपालिकेने जर सुधारित रस्ता केला तर भविष्यात हे मंदिर आणि परिसर पर्यटक पर्यटनस्थळ म्हणून ज्ञात होईल आणि माथेरानचे पर्यटन आणखी बहरेल.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Unlock : मुंबईतील उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत राहणार सुरु


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -