घरताज्या घडामोडीUran : करंजा खोपटा खाडीत तिवरांची कत्तल करणार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा...

Uran : करंजा खोपटा खाडीत तिवरांची कत्तल करणार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा…

Subscribe

करंजा बंदर प्रकल्पाला लागून असलेल्या ठिकाणची तिवरे तोडली गेली आहेत.

उरणच्या करंजा गावालगत भर समुद्रात मोठ्या प्रमाणात भराव करून उभारलेल्या जय मेहता यांच्या खाजगी मालकीच्या बंदराने तिवरांच्या केलेल्या कत्तलीप्रकरणी तात्काळ कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा उरण सामाजिक संघटनेने दिला आहे. करंजा आणि खोपटे खाडीत केल्या जाणार्‍या तिवरांच्या कत्तलीप्रकरणी उरणमधील सामाजिक संघटनेने अनेकदा प्रशासनाला कारवाईची मागणी केली होती. तिवरांच्या कत्तलीचे व्हिडीओ आम्ही दिले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याबरोबरच येत्या सात दिवसांच्या आत बंदरामुळे बाधीत झालेल्या मासेमारांना योग्य ती नुकसान भरपाई न दिल्यास तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल , असा इशारा देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनानंतरही प्रशासन जागे न झाल्यास मासेमारांच्या सर्व नौका घेऊन भर समुद्रात चॅनल बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बंदराची जी पर्यावरणीय विषयक सुनावणी झाली तेव्हा मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वीच एका बार्जच्या साहाय्याने एका दुसर्‍या होडीच्या माध्यमातून तोडलेली तिवरे भर समुद्रात घेऊन जाऊन तिवरे समुद्रात फेकून देण्याचा प्रकार काही मासेमारांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. त्या अनुशंगाने उरण सामाजिक संस्थेने केलेल्या तक्रारीच्या निमित्ताने २९ सप्टेंबरला या प्रकल्पाची स्थळ पाहणी करण्यात आली होती . त्या स्थळ पाहणी अहवालातही करंजा बंदर प्रकल्पाला लागून असलेल्या ठिकाणची तिवरे तोडली गेली असल्याचे आढळून आले आहे.

- Advertisement -

प्रशासनाला अल्टिमेटम

सातत्याने मागणी करूनही प्रशासनाला जाग येत नाही. आता तिवरांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होईल, त्सुनामी सारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. तिवराच्या कत्तलीला तात्काळ पायबंद घालण्याची जबाबदारी न पाळल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.
सुधाकर पाटील -अध्यक्ष(उरण सामाजिक संघटना)


हे ही वाचा – Maharshtra Unlock: राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -