Goa Election 2022 Live Update: नेहरुंनी गोव्याला वाऱ्यावर सोडलं – पंतप्रधान मोदी 

नेहरुंनी गोव्याला वाऱ्यावर सोडलं – पंतप्रधान मोदी


गोव्याला मदत करणाऱ्यांना पाठबळ देऊन नका असे नेहरुंनी दिले होते आदेश – पंतप्रधान मोदी


भाजपची सर्वात मोठी ताकद भाजप कार्यकर्ते आहेत – पंतप्रधान मोदी


गोव्याची निवडण स्पष्ट आहे, गोवा भाजपसोबत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी


एकाबाजूला विकासवादी भाजप आणि दुसऱ्या बाजूला अस्थिर काँग्रेस आहे – पंतप्रधान मोदी


काँग्रेस गोव्यातील तरुणांचं स्वप्न कधीही समजू शकलं नाही – पंतप्रधान मोदी


काही लोकं येतात आणि पत्रकार परिषद घेऊ जातात, असा टोला राहुल गांधी आणि केजरीवाल यांना पंतप्रधान मोदींनी लगावला


गोवा कोणतेही काम अर्धे सोडत नाही – पंतप्रधान मोदी


गोव्यात सर्व योजना १०० टक्के पूर्ण – पंतप्रधान मोदी


सर्व योजना राबवण्यात गोवा अग्रेसर – पंतप्रधान मोदी


डबल इंजिन सरकारमुळे गोव्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण – पंतप्रधान मोदी


१०० टक्के लसीकरण झालेले गोवा देशातील पहिलं राज्य – पंतप्रधान मोदी


२०१९नंतर गोव्यातील पर्यटकांची संख्या ८० लाखांवर – पंतप्रधान मोदी


पर्यटकांची वाढलेली संख्या म्हणजे गोव्याचा विकास दाखला – पंतप्रधान मोदी


गोव्यात उद्योग आणि व्यापारात गुंतवणूक वाढवणार – पंतप्रधान मोदी


गोव्यात मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. – पंतप्रधान मोदी


उत्तर गोव्याचा विकास होत असेल तर दक्षिण गोव्याचाही विकास होणार – पंतप्रधान मोदी


‘देश काँग्रेस मुक्त’ शब्द देशातील कोट्यावधी नागरिकांचा संकल्प झाला आहे – पंतप्रधान मोदी


माझ्या पंतप्रधान कारकीर्दीची सुरुवात गोव्यातून झाली – पंतप्रधान नरेंद्र मोदी


गोव्यात आल्यावर मनोहर पर्रिकरांची कमतरता जाणवते – पंतप्रधान मोदी


१४ फेब्रुवारीला गोव्यात पुन्हा एकदा कमळ फुलणार – पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांची सुरुवात स्थानिक भाषेतून


भाजपचं सरकार गोव्यात येणार – मुख्यमंत्री प्रमोद सावंत


पंतप्रधान नरेंद्र मोदींची गोव्यातील जाहीरसभा सुरू


थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची गोव्यात जाहीरसभा सुरू होणार


निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले आहेत. म्हापसा येथे पंतप्रधान मोदींची सभा होणार असून भाजप आमदार नितेश राणे मोदींच्या भेटीसाठी गोव्यात दाखल झाले आहेत.


उत्तरप्रदेशात दुपारी 1 वाजेपर्यंत विविध जिल्ह्यात झालेली मतदानाची आकडेवारी


यूपीला आम्ही दंगलमुक्त दहशतवादमुक्त करू- भाजप नेते जेपी नड्डा

देवबंद, मेरठ, रामपूर, आझमगड, कानपूर आणि बहराइचमध्ये दहशतवादविरोधी कमांडो केंद्रे बांधली जात आहेत…
अखिलेश सरकारच्या काळात यूपीमध्ये २०० दंगली झाल्या. योगी सरकारच्या काळात एकही दंगल झाली नाही.


जयंत चौधरी यांनी केले नाही मतदान


उत्तरप्रदेशमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 35.03 टक्के मतदान


मतदारांना धमकावल्याची सपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानावर सपाने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. कैराना आणि शामलीमध्ये गरीब मतदारांना धमकावले जात असून त्यांना लाईनमधून दूर केले जात असल्याचा आरोप सपाने केला आहे.

याशिवाय भाजप उमेदवार पक्षालिका सिंह यांचे पती आणि भाजप नेते अरिदमन सिंह यांनी आग्रा जिल्ह्यातील बाह विधानसभा-९४, बुथ क्रमांक २८७, २८८ येथे सपा-आरएलडी युतीच्या मतदारांना धमकावत असल्याचा आरोप सपाने केला आहे. सपा म्हणाले की, निवडणूक आयोगाची दखल घेत निष्पक्ष आणि भयमुक्त निवडणुका घेण्याची खात्री करा.


अलीगडच्या खैर विधानसभा मतदारसंघातील धुमरा गावात ईव्हीएम मशीन बिघडल्या


105 वर्षीय महिला मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचली 

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान करण्यासाठी 105 वर्षीय महिला मुझफ्फरनगरमधील मतदान केंद्रावर पोहोचली. मी विकास आणि सुरक्षिततेसाठी मतदान केले आहे, असे ती म्हणाली.


अलिगढमध्ये सकाळी 11 पर्यंत 18 टक्के मतदान, हापूडमध्ये 23 टक्के मतदान तर मेरठमध्ये 17 टक्के मतदान

शामली- 22.83 टक्के
मुझफ्फरनगर- 22.65 टक्के
मेरठ- 18.54 टक्के
मथुरा- 20.73
हापूर- 22.80
गाझियाबाद- 18.24
गौतम बुद्ध नगर- 19.23
बुलंदशहर- 21.62
बागपत- 2230


“आधी मतदान, मग अल्पोपहार…” पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मतदारांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वविट करत उत्तर प्रदेशाच्या जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. “मी सर्व मतदारांना विनंती करतो की, कोविड-१९ नियमांचे पालन करून लोकशाहीच्या या पवित्र सणात उत्साहाने सहभागी व्हावे. लक्षात ठेवा – आधी मतदान करा, मग अल्पोपहार!” असं ट्वीट मोदींनी केलं आहे.


उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २० टक्के मतदान झालं आहे.


नव्या यूपीचा नारा, विकासचं बनेल विचारधारा : अखिलेश यादव


#UttarPradeshElections2022 च्या पहिल्या टप्प्यात आज बुलंदशहरचे भाजप खासदार डॉ भोला सिंह यांनी केले मतदान


थुरेत अनेक ठिकाणी तर मेरठमध्ये 20 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड 

मथुरेतील गोवर्धनच्या आदर्श कामिनी शिक्षा निकेतनच्या बूथ क्रमांक 75 वर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान एक तास उशिराने सुरू झाले.

त्याचवेळी फराळ येथील बूथ क्रमांक 473 चे मशीन सतत बिघडत होत आहे.

मेरठमध्ये 20 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड


उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जेवार आणि शामली येथील बुथवर मतदान सुरु


मेरठमधील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, बागपतमध्ये मतदारांच्या मोठ-मोठ्या रांगा


उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींना मतदारांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे केले आवाहन


ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने शामली येथील गोहरपूर गावातील मतदान केंद्रावरील मतदान ठप्प


मथुराच्या गोवर्धन विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 50-51 वर मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी


उत्तरप्रदेश विधानसभेसाठीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात

सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

11 जिल्ह्यातील 58 मतदारसंघात आज मतदान

यासाठी ६२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

थंडी असतानाही यूपीत हापूरमधील २५७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा