Mission kavach kundal : अलिबाग तालुक्यात मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण सुरू

घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे.

Vaccination started under Mission Kavach Kundal in Alibag taluka
अलिबाग तालुक्यात मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण सुरू

कोरोनाशी सामना करण्यासाठी सध्या वेळेवर लसीकरण करुन घेणे हाच एक पर्याय उपलब्ध आहे. यासाठी अलिबाग तालुक्यातील आजपासून मिशन कवच कुंडल योजना अंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरवात झाली आहे. ज्यांचे लसीकरण राहिलेले आहे किंवा ज्यांना घरातून केंद्रापर्यंत जाता येत नाही, अशा नागरिकांसाठी घरोघरी किंवा त्यांच्या परिसरात जाऊन मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर तसेच तहसील कार्यालय अलिबाग व तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिथे लसीकरण झाले नाही त्या ठिकाणी जाऊन त्यांना लस देण्यात येत आहे.

तहसीलदार मीनल दळवी आणि त्यांची यंत्रणा, डॉ. अभिजित घासे तालुका आरोग्य अधिकारी व त्यांची यंत्रणा तसेच डॉ. राजाराम हुलवान आणि माणुसकी प्रतिष्ठान टीम मिळून किहीम परिसरात आदिवासी वाडीमध्ये सर्व लोकांचे लसीकरण करून घेतले. तहसील कार्यालयातून सर्वांनी लसीकरण करून घ्या, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम यशस्वीपणे राबवण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला असून, नागरिकांनी त्याला प्रतिसाद देत सर्वांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवन यांनी यांनी केले आहे.

राज्य शासनाने तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने शहरी व ग्रामीण भागात मिशन कवच कुंडन मोहिम राबविण्यात सुरवात केली आहे. या मोहिमेत सहभागी होवून आरोग्य विभागाने अलिबाग तालुका १०० टक्के लसीकरण युक्त करण्यासाठी कंबर कसली आहे.

राहिलेल्या लोकांना लसीकरण करुन घेण्यासाठी मिशन कवच कुंडलचे आयोजन करण्यात आले असून, जे लोक लसीकरणापासून वंचित आहे अश्या नागरिकांसाठी प्रत्येक गावस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून राहिलेल्या लोकांनी त्यात सहभागी होऊन आपले लसीकरण करुन घेऊन आपल्याबरोबर आपल्या कुटूंबाचेही संरक्षण करणे अपेक्षित असल्याचे डॉ. हुलवन यांनी सांगितले आहे.


हे ही वाचा – Jammu Kashmir Encounter: राजौरीत दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत लष्कराच्या अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद