नालासोपारा बनले वेश्या व्यवसायाचा अड्डा, ५००० बांग्लादेशी मुलींना वेश्या बनवणारा नराधम गजाआड

विजयला इंदूरला वेश्याव्यवसायाचे केंद्र बनवायचे होते.

mumbai police arrested spa Owner in malad and released woman
मालाड येथील स्पावरील कारवाईत मालकाला अटक, एका महिलेची सुटका

मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय प्रकरणात इंदूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबईतील नालासोपारा भागात राहणारा विजय कुमार दत्त २५ वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आला होता.त्याने भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रेसुद्धा बनवले आहेत. पत्नीला भेटण्याच्या बहाण्याने तो सतत बांग्लादेशला जायचा. त्याने आतापर्यंत ५ हजारांहून अधिक मुलींना देहव्यापारासाठी भाग पाडल्याची कबुली इंदूर पोलिसांना दिली आहे. आरोपीला अटक झाली असून, चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

इंदूर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने विजय दत्तसह त्याचा साथीदार बबलू याला बाणगंगा परिसरातील कालिंदी गोल्ड सिटी येथील उज्ज्वल ठाकूरच्या घरातून अटक केली आहे. उज्ज्वल, बबलू आणि सैजलच्या मदतीने विजयला इंदूरला वेश्याव्यवसायाचे केंद्र बनवायचे होते. इंदूरहून फ्लाइट, बस आणि ट्रेनच्या सहज उपलब्धतेमुळे मुलींचा पुरवठा सुलभ होतो. इंदूरहून सुरत, राजस्थान आणि मुंबईसह इतर ठिकाणी मुलींचा पुरवठा करण्यासाठी तो साखळी तयार करण्याचा प्रयत्न करत होता.

१० मुलींशी लग्न आणि १०० हून अधिक प्रेमिका

विजय दत्तने पोलिसांना सांगितले की, तो बांगलादेशातील शबाना आणि बख्तियार यांच्यामार्फत गरीब घरातील मुलींना नोकरीच्या बहाण्याने भारतात आणत असे. पुढे तो त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत असे. तो बांगलादेशी मुलींना मुंबईतील नाला सोपारा आणि इतर ठिकाणी लपवून ठेवायचा. विजयने १० मुलींशी लग्न केले आहे. त्याच्या १०० हून अधिक गर्लफ्रेंड आहेत, ज्यांच्याकडून तो देहव्यापार करून घेतो.

 


हे ही वाचा : लहान मुलांसोबत Oral Sex हा गंभीर गुन्हा नाही; शिक्षेत घट करण्यासाठी अलाहाबाद हायकोर्टाचा अजब निर्णय