घरताज्या घडामोडीसुधागडमध्ये गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, पोलिसांची धडक कारवाई

सुधागडमध्ये गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, पोलिसांची धडक कारवाई

Subscribe

पेंढारमाळ ठाकूरवाडी जंगलातील गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले

सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा पोलीस दुरक्षेत्र हद्दीत पेंढारमाळ ठाकूरवाडी डोंगर परिसरात गावठी दारूची हातभट्टी सुरू होती. ही सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी गुरुवारी पोलिसांनी उध्वस्त केली.तसेच, याबरोबर सापडलेला मुद्देमाल देखील नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे सुधागड तालुक्यातील गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक फौजदार मनोहर म्हात्रे, पोलीस नाईक कांचन भोईर आणि पोलीस शिपाई रामसेवक कांदे यांनी छापा  घालून एक बेवारस गावठी दारूची हातभट्टटी उध्वस्त केली आहे.
त्यात १ पत्र्याची २०० लिटरची टाकी आणि प्लास्टिकचे २५ लिटर प्रमाणे ४ ड्रम यामध्ये एकूण ३०० लिटर गुळ आणि नवसागर मिश्रित रसायन व दारूनिर्मिती साहित्य जप्त केले. या मालाची एकूण किंमत अंदाजे ८६०० रुपये आहे.  हे सर्व साहित्य आणि माल हा जंगल भागांमधून वाहून घेऊन जाण्यास अवजड व अवघड असल्याने पोलिसांनी सदर मालाचा जागेवरच पंचनामा करून टाकी व प्लास्टिक ड्रम फोडून टाकले. दारू आणि दारूनिर्मितीचे रसायन जमिनीवर ओतून जागेवरच नाश करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -