Palghar: बसस्थानकाचं बनलं खासगी वाहनतळ?

बसस्थानकाच्या आवारात खाजगी वाहनांनी अतिक्रमण

wada bus station become private parking lot?

– संतोष पाटील 

राज्य परिवहन महामंडळाचे विलनीकरण करण्यासाठी राज्य  कर्मचारी वर्गाने पुकारलेल्या संपाने पालघर जिल्ह्यातील बहूतांशी भागातील बसेसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. बसेसच्या फेऱ्या कमी झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण जनतेला सहन करावा लागत आहे.बस स्थानकात बसेसची ये जा कमी प्रमाणात होत असल्याने  बसस्थानकाचं वाहनतळ झाल्याचं सद्या वाडा शहरातील बसस्थानकाच्या आवारात खाजगी वाहनांनी अतिक्रमण पहावयास मिळतेय.

सरकारने राज्य परिवहन महामंडळाचे विलिनीकरण्यात यावे यामागण्यांसाठी एसटी कर्मचारी वर्गाने गेल्या दोन महीण्यांपासुन संप सुरु आहे. माञ या संपाने सामान्य जनतेला फटका बसत आहे.वाडा तालुक्यात 37 बसेस मधून 7 बसेस ग्रामीण भागात सुरु ठेवण्यात आल्या आहेत.बस स्थानकातून बसेस कमी धावत असल्याने त्या बस स्थानकाच्या एका बाजुला खाजगी वाहनांच अतिक्रमण केल्याचे वाडा बसस्थानक मधील कर्मचारी खाजगीत बोलतात. तेथील एका कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी ही खाजगी वाहन काढण्यात येतील.वाडा बसस्थानक मधुन खाजगी वाहन बसस्थानक परीसरात उभी करण्यात येऊ नये असे वारंवार असे ध्वनीक्षेपकद्वारे निर्देश दिले जातात.

तरी याठिकाणी खाजगी वाहनांमध्ये इनोव्हा, होंडासिटी कार,इको, इर्टीका कार यासारख्या उभ्या केल्या जात असतात. याबाबत वाडा शहरातील जेष्ठ काँग्रेस नेते संजय भानुशाली यांनी सदर कोरोना काळ चालू आहे.त्याचबरोबर एसटी कर्मचारी यांचा संप चालू आहे. बस स्थानकाची जागा खाली आहे. वाडा नगरपंचायत हद्दीत वाहन रस्त्यावर उभी करावी लागतात.जो पर्यंत एसटी चालू  होत नाही.तो पर्यंत वाहनतळाचा उपयोग करावा अशी माहीती त्यांनी दिली.  पालघर जिल्ह्यात पालघर राज्य परिवहन विभागाचे आंदोलनात 31 डिसेंबर 2021 ला वाहक 275 व चालक 676 असे एकुण 1036  कर्मचारी संपात सहभागी झाले होते.


हेही वाचा – अनधिकृत बांधकामांच्या संख्येत भर; मात्र कारवाई शून्य