उरण : उपोषणाच्या इशार्‍यानंतर रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाला जाग

नवघर आरोग्य उपकेंद्राला ६१ लाखांचा निधी

Wake up to the health department of the uran jeep after the hunger strike signa
उरण : उपोषणाच्या इशार्‍यानंतर रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाला जाग

सेनेच्या इशार्‍यानंतर रायगड जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाला अखेर खडबडून जाग आली आहे. २० वर्षांपासून अडगळीत पडलेल्या नवघर आरोग्य उपकेंद्राची नव्याने इमारत उभारण्यासाठी ६१.६७ लाख रुपयांच्या खर्चाला तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.उरणच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेले नवघर आरोग्य उपकेंद्र मागील २० वर्षापासून बंदच आहे.बंद पडलेल्या दयनीय अवस्थेतील आरोग्य उपकेंद्रामुळे गरीब-गरजू रुग्णांना उपचारासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. नवीन उपकेंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही उपकेंद्राची दुरुस्तीकडे दुर्लक्षच केले जात होते. तसेच याप्रकरणी विविध वर्तमान पत्रात रायगड जिल्हा परिषदेचा गळथान कारभाराविरोधात टिकेची झोड उठवली होती. तसेच संतप्त झालेल्या सेनेचे राजिप सदस्य विजय भोईर यांनी कामचुकार शासकीय अधिकार्‍यांविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही रायगडच्या पालकमंत्री आदित्य तटकरे यांना दिलेल्या निवेदनातून दिला होता.

सेनेच्या या इशार्‍यानंतर राजिपच्या आरोग्य विभागाला अखेर जाग आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी नवघर आरोग्य उपकेंद्राची दुमजली इमारत उभारण्यासाठी तातडीने बैठक घेऊन ६१.६७ लाख रुपयांच्या खर्चाला तत्काळ प्रशासकीय मान्यता दिली. नव्याने उभारण्यात येणार्‍या नवघर आरोग्य उपकेंद्रात रुग्णांसाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे राजिप सदस्य विजय भोईर यांनी दिली.


हे ही वाचा – राणेंनी त्यांच्या खात्याचा विकास करावा, उगाच शहाणपणा कराल तर..; राऊतांचा इशारा