घरठाणेठाण्यातील काही भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार बंद

ठाण्यातील काही भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार बंद

Subscribe

ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ठाण्यातील काही भागांत बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद असणार आहे. ठाण्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या पंपामध्ये अतिवृष्टीमुळे गाळ अडकला आहे.

ठाणे : ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ठाण्यातील काही भागांत बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद असणार आहे. ठाण्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या पंपामध्ये अतिवृष्टीमुळे गाळ अडकला आहे. त्यामुळे हा गाळ काढण्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. (Water supply will closed in thane for 12 hours on Wednesday)

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला वेळोवेळी पूर आलेला असून पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा जमा झालेला आहे. हा गाळ व कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने पंपाद्वारे होणारा पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे. तो गाळ काढण्यासाठी बुधवार 21 सप्टेंबर रोजी शटडाऊन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.

- Advertisement -

बुधवार सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजेच 12 तासांसाठी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच इंदिरानगर संप कडे जाणाऱ्या 1968 मुख्य गुरुत्वजलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनसाठी इंदिरानगर संप वरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, येऊर, डिफेन्स, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर इ. भागात पाणी पुरवठा बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पुर्णपणे बंद राहणार आहे.

या शटडाऊन मुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महात्मा गांधी जयंती दिनी नदी महोत्सवाचा शुभारंभ; सुधीर मुनगंटीवारांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -