Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम आधी केली बेपत्ता असल्याची तक्रार, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

आधी केली बेपत्ता असल्याची तक्रार, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

पत्नीने कोणावरही संशय येऊ नये म्हणून ४ जूनरोजी आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

Related Story

- Advertisement -

अनैतिक संबंधातून हत्या होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच घटना डोंबिवलीमधून समोर येत आहे. पत्नीने अनौतिक संबंधातून आपल्या प्रियकराच्या साथीने पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या मानपाडा येथील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये प्रवीण पाटील आणि लक्ष्मी पाटील हे दोघे पती पत्नी राहत होते. लक्ष्मी हिचे अरविंद नावाच्या एक व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधांची प्रवीण पाटील यांना संपूर्ण कल्पना होती. त्यामुळे सतत दोघांमध्ये यावरुन वाद होत होते. दोघांच्या रोजच्या भांडणाला वैतागून पत्नी लक्ष्मी हिने प्रियकरासोबत पतीच्या हत्येचा कट रचला. (Wife killed husband help of her boyfriend in dombivali)

२ जून रोजी पत्नी लक्ष्मीला पती प्रवीणने मारहाण केल्याची माहिती तिने प्रियकर अरविंदला दिली त्यानंतर अरविंद तिला घेऊन आपल्या घरी गेला. त्यानंतर पती आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झालं. याचवेळी अरविंद आणि त्याचा साथीदार सनी यांनी लोखंडी रॉडने प्रवीणला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रवीणच्या गळ्यावर धारदार चाकू फिरवत त्याचा खून करण्यात आला. मध्यरात्री प्रवीणचा मृतदेह चटईमध्ये गुंडाळून रिक्षामधून शेलू गावाजवळील मोरीखाली येथे फेकून देण्यात आला. पत्नीने कोणावरही संशय येऊ नये म्हणून ४ जूनरोजी आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

- Advertisement -

पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पत्नीला मानपाडा पोलीस व कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशी दरम्यान पत्नीकडून पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्याचबरोबर पत्नीच्या संपर्कात असलेला प्रियकर अरविंद आणि त्याचा साथीदार सनी या दोघांचीही पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत पत्नी लक्ष्मी आणि अरविंदचे अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले. त्यांनी मिळून प्रवीण याची हत्या केल्याचे समोर आले.


हेही वाचा – शरीरसुखाची मागणी : तरुणीने दीड हजार घेत भरस्त्यात केली धुलाई

- Advertisement -

 

- Advertisement -