Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे कोरोनाचे नियम पायदळी तुडवत कल्याण डोंबिवलीत वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन  

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत कल्याण डोंबिवलीत वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन  

कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत जंगी सोहळे करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांविरोधात मात्र केडीएमसीकडून कोणतीच कार्यवाही केली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर वाढती कोरोना संख्या पाहता अखेर केडीएमसीने अशा बड्या पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. 

Related Story

- Advertisement -

कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे वाढती कोरोना रुग्णांची संख्या असतानाही कोरोनाचे नियम पायदळी तुडवत वाढदिवसाचे  सेलिब्रेशन केल्याप्रकरणी केडीएमसीच्या तक्रारीनंतर 4 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारी रात्री लोढा हेरिटेज, देसलेपाडा परिसरात हा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला होता. गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण राज्यासह कल्याण डोंबिवलीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत केडीएमसीची प्रशासकीय यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. अशातच कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या सामान्य नागरिकांवर केडीएमसी प्रशासनाकडून कारवाई सुरूच आहे. अशावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत जंगी सोहळे करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांविरोधात मात्र केडीएमसीकडून कोणतीच कार्यवाही केली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर वाढती कोरोना संख्या पाहता अखेर केडीएमसीने अशा बड्या पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

कल्याण डोंबिवलीत सोशल डिस्टसींगचा फज्जा,4 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

लोढा हेरिटेज परिसरात संदीप माळी यांच्या वाढदिसानिमित्त जंगी सेलिब्रेशन आयोजित केले होते. ज्यामध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक लोकांची गर्दी जमल्याचे तसेच या गर्दीमध्ये अनेकांनी मास्क परिधान न करण्यासह सामाजिक अंतरही न पाळल्याचे दिसून आले. गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण राज्यासह कल्याण डोंबिवलीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, 18 February 2021

- Advertisement -

लोढा हेरिटेज परिसरात संदीप माळी यांच्या वाढदिसानिमित्त जंगी सेलिब्रेशन आयोजित केले होते. ज्यामध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक लोकांची गर्दी जमल्याचे तसेच या गर्दीमध्ये अनेकांनी मास्क परिधान न करण्यासह सामाजिक अंतरही न पाळल्याचे दिसून आले. यावरून केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक 10/ई चे प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांनी याप्रकरणी समक्ष पाहणी करून  माहिती घेऊन कोविड -19 च्या नियमांचे पालन न करणाऱ्या संदीप माळी ,मनोहर डोंगरे ,आनंद कांबळे ,हनुमंत जगताप यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 269, 270,188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम ५१(ब) अंतर्गत तक्रार दाखल केली. त्यावरून मानपाडा पोलीसांनी या चौघांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही कोरोना रुग्णांचे प्रमाण सध्या वाढताना  दिसून येत आहे. तरी अशा परिस्थितीत नागरिकांनी कटाक्षाने वारंवार हात धुणे ,  सार्वजनिक ठिकाणी वावरतांना न चुकता मास्कच्या वापर करणे आणि सामाजिक अंतर पाळणे(Social Distincing) या त्रिसूत्रीच्या अवलंब करावा असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Corona In Maharashtra: राज्यात २४ तासांत ५,४२७ नव्या रुग्णांची वाढ, ३८ जणांचा मृत्यू

- Advertisement -