घरठाणेठाण्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी

ठाण्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी

Subscribe

ठाण्यात मेट्रोच्या कामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानच आता रस्ता दुरुस्तीकरीता खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ठाण्यात मेट्रोच्या कामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानच आता रस्ता दुरुस्तीकरीता खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. कुमोदीनी रोशन फिरके (३८) असे या महिलेचे नाव असून, ही महिला किरकोळ जखमी झाली आहे.

ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वागळे इस्टेट, रोड क्रमांक ३३ येथे घडली. खोदून ठेवलेल्या रस्त्याला बॅरिगेटिंग केले नसल्याने ही घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Woman injured after falling into pothole in Thane)

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट, या ठिकाणी कामगार हॉस्पिटल ते इंदिरा नगर नाक्यापर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिगेटिंग करण्यात आलेली नाही. तसेच,ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कुमोदीनी नामक महिला त्या रस्त्याने जात असताना खोदून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये पडल्या.

या घटनेत त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच याबाबत शुक्रवारी सकाळी रोहन फिरके यांनी ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेला माहिती दिल्यावर ही घटना समोर आली. या घटनेच्या तक्रारीची संबंधित विभागाने नोंद घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, असेही आपत्ती व्यवस्थापन कक्षमार्फत सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, मेट्रोच्या कामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट सुनिता बाबासाहेब कांबळे (३७) या महिलेच्या अंगावरती पडून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील मुंबई नाशिक रोड जवळ, उत्सव हॉटेल समोरच्या बाजूला घडली. ती महिला भंगार गोळा करण्याचे काम करते अशी माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.


हेही वाचा – IND vs SL t20 : श्रीलंकेचा भारतावर विजय; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -