Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम देवीला खूष करण्यासाठी आईने कुऱ्हाडीनं स्वतःच्या मुलाचं छाटलं मुंडकं

देवीला खूष करण्यासाठी आईने कुऱ्हाडीनं स्वतःच्या मुलाचं छाटलं मुंडकं

Related Story

- Advertisement -

एका अंधश्रद्धाळू आईने देवीला खूष करण्यासाठी स्वतःच्या २४ वर्षाच्या मुलाचा बळी दिल्याचे समोर आले आहे. या आईने देवीसाठी कुऱ्हाडीनं मुलाचं मुंडकं छाटलं आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्हातील कोतवाली पोलीस ठाणे परिसरातील कोहनी गावात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पन्ना कोतवाली पोलीस ठाण्यातले प्रभारी अरुण सोनी यांनी सांगितले की, ‘आज पहाटे साडे चारच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, कोहनी गावात सुनिया बाई लोधी (जवळपास ५० वय)ने आपला मुलगा द्वारका लोधी (२४ वय) गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली आहे. सुनिया बाईंनी गेल्या दोन वर्षांपासून दैवी प्रभाव झाल्याचे जाणवत होते.’

- Advertisement -

दरम्यान आरोपी महिलेवर कायदेशीर कारवाईनंतर मुलाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरू आहे. या घटनेत वापरलेली कुऱ्हाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. दरम्यान एका गावकऱ्यांने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘सुनिया बाईने आपल्या मुलाला ठार मारले आहे. तिच्या अंगात देवी येत होती आणि बोलत होती की, मी बळी घेईन. मग तिने रात्री आपल्या मुलाची हत्या केली.’


हेही वाचा – ‘सलमान त्रास देतो’ आई वडिलांची बदनामी रोखण्यासाठी नाजिशची आत्महत्या


- Advertisement -

 

- Advertisement -