घरक्राइमभाजप-काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची अभद्र युती; अल्वपयीन मुलींचे सेक्स रॅकेट चालवले

भाजप-काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची अभद्र युती; अल्वपयीन मुलींचे सेक्स रॅकेट चालवले

Subscribe

भाजप माजी जिल्हाध्यक्ष सुनीता वर्मा यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

भाजप-काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची एक अभद्र युती समोर आली आहे. काही अल्पवयीन मुलीचे सेक्स रॅकेट चालवण्याचा खळबळजनक आरोप राजस्थानमधील भाजप आणि काँग्रेसच्या माजी महिला पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी एका भाजपच्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

भाजपच्या सवाई माधोपुरच्या माजी जिल्हाध्यक्ष सुनीता वर्मा उर्फ भट्टीबाई आणि काँग्रेस सेवादल महिला कक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष पूजा आणि पूनम चौधरी या हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्याकडून वाईट काम करून घेतली जात होती.

- Advertisement -

सवाई माधोपुर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीने या घटनेचा खुलासा केल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत शिवराम मीणा, जिल्हा उद्योग केंद्रात कार्यरत असलेले संदीप शर्मा, इलेक्ट्रिशियन राजू आणि सुनीता यांचे सहकारी हिरालाल यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पण यामधल्या मुख्य आरोपी काँग्रेसच्या नेत्या पूनम चौधरी फरार असून भाजप नेत्या सुनीता वर्मा यांना अटक करण्यात आली आहे.

या अल्पवयीन मुलीने आपल्या जबाबात म्हटले आहे की, ‘भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही जिल्हास्तरीय नेते राज्यातील इतर बड्या नेत्यांसोबत हे सेक्स रॅकेट चालवत होते आणि यातील मुलींना इतर जिल्ह्यात पाठविले जात होते.’

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष सुनीता वर्मा यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘राजकारणात चरित्रहीन लोक मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांना त्यांची नावे आणि काम दोन्ही माहित आहेत. जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या या सर्वांचा खुलासा करतील.’ पण आता सुनीता वर्मा यांच्या पर्दाफाश झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


हेही वाचा – यूपीत नराधमांचा हैदोस; हाथरस नंतर बलरामपूर, भदोही येथेही बलात्कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -