घरताज्या घडामोडीMumbai-goa Highway : महामार्गाच्या कामाला पुन्हा गती येणार ; नितीन गडकरी यांचे...

Mumbai-goa Highway : महामार्गाच्या कामाला पुन्हा गती येणार ; नितीन गडकरी यांचे आश्वासन

Subscribe

पनवेल-इंदापूर विभागाच्या चौपदरीकरणही प्रगतीने

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबई गोवा महामार्ग महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू केल्याबद्दल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले. यामुळे महाराष्ट्र हायस्पीड कनेक्टिव्हिटीने व्यापले जाईल ज्याचा अनेक क्षेत्रांना फायदा होईल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबई-गोवा महामार्ग एनएच-६६ च्या पनवेल-इंदापूर विभागाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आणि त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याबाबत तटकरे यांनी गडकरींना विनंती केली.

मुंबई-गोवा एनएच-६६ या मार्गावरील भूसंपादनाच्या समस्येमुळे चौपदरीकरणाच्या कामावर होत असलेल्या परिणामांवर तोडगा काढण्याबाबत, बिरवाडी एमआयडीसीजवळ एनएच-६६ साठी अतिरिक्त व्हेंट एरिया प्रदान करण्याबाबत व रायगड रोड राष्ट्रीय महामार्ग एनएच-६६ एफ ला ऐतिहासिक मार्ग बनवण्याबाबतही भेटीत चर्चा झाली. एनएच-६६ वरील कशेडी घाटातील एंट्री पॉईंट आणि एक्झिस्ट पॉईंट येथे सुशोभीकरण स्पॉट प्रदान करण्याची व लोटे एमआयडीसी जवळील सीएच १९४.६०० आवाशी गुनाडे येथे व्हीयुपी प्रदान करण्याची मागणी केली. एनएच ७५३ एफ चा पुणे-पौड-मुळशी-ताम्हणी घाट-माणगाव-म्हसळा- दिघी बंदर हा विभाग आणि ५४८ए चा पाली फाट्यापासून वाकण फाटा व इंदापूर-तळा-आगरदंडाचा या विभागांचे ९५% काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे गडकरी यांना आवर्जून कळवले व त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या या विभागांचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रित केले.

- Advertisement -

हे ही वाचा – palghar ZP election result 2021 : पालघरमध्ये शिवसेना खासदारपुत्र रोहित गावितचा पराभव, भाजपचा उमेदवार विजयी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -