घरताज्या घडामोडीभविष्य निर्वाह निधीची रक्कमेसाठी महिंद्रा सॅनियोच्या कामगारांचा ठिय्या

भविष्य निर्वाह निधीची रक्कमेसाठी महिंद्रा सॅनियोच्या कामगारांचा ठिय्या

Subscribe

भरपावसात हे आंदोलन सुरु असून सचिन गोळे यांनी व्यवस्थापनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, असा इशारा दिला आहे.

भविष्य निर्वाह निधीची मागणी करताच कामावरून कमी करण्यात आलेल्या ४६ कामगारांनी महिंद्रा सॅनियो व्यवस्थापनाविरोधात आंदोलन छेडले असून, कंपनीच्या प्रवेशद्वारावरच धडक दिली आहे. पीएफची रक्कम मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा कामगारांनी दिला आहे. पीएफच्या मागणीस्तव कामगारांनी मनसेच्या कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे.या आंदोलनात मनसे कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस सचिन गोळे यांनीही सहभाग घेतला आहे. भरपावसात हे आंदोलन सुरु असून सचिन गोळे यांनी व्यवस्थापनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, असा इशारा दिला आहे.

महिंद्रा सॅनियोमधल्या ठेकेदाराने गेल्या दोन वर्षांपासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याचे लक्षात आल्यापासून कामगारांनी सदर रक्कम जमा करावी, अशी मागणी लावून धरली होती. या मगणीच्या पाठपुरावार्थ कंत्राटी कामगारांनी मनसेच्या कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारल्यावर सर्व ४६ कामगारांना कामावरून काढण्यात आले.
या कृतीचा निषेध म्हणून कामगारांनी आंदोलन पुकारले असून, मनसेचे पदाधिकारी महेश सोगे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक दर्गे, शहर अध्यक्ष अनिल मिंडे, सतिष येरुणकर, बाळा दर्गे, अविनाश देशमुख, सतीश घोडविंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कामगारांबरोबर कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हाडाची ८ हजार २०५ घरांची लॉटरी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -